विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा जूनअखेरपासून

bAMU

औरंगाबाद – मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन परीक्षेत उडणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ आता थांबणार आहे. जून अखेर पासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी होम सेंटरची सुविधा असणार नाही. विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील. कोरोना काळात विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. चालू शैक्षणिक वर्षातील … Read more

मुंबईत रेल्वे रुळावरून घसरल्याने मराठवाड्यातील रेल्वेसेवा विस्कळीत, ‘या’ गाड्या रद्द 

Mumbai Railway Accident

औरंगाबाद – मध्य रेल्वेमधील दादर-पोन्डिचेरी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्यांना बसला आहे. नांदेड रेल्वे विभागातून मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे. रद्द करण्यात आलेली गाडी – 1. मुंबई येथून सुटणारी मुंबई … Read more

मनसेनं जी टोपी घातली, तीच टोपी आज तुम्ही घातली; भाजप नेत्यांनं दिल ‘हे’ उत्तर

औरंगाबाद – सध्या राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून विविध राजकीय पक्ष आपली भूमिका मांडत आहेत. त्यातच आज हनुमान जयंती असल्याने सकाळी मनसेच्या वतीने सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. त्यानंतर भाजपच्या वतीने ही सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सारखीच टोपी घातल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना … Read more

गुणरत्न सदावर्तेंच्या सहकार्याला औरंगाबादेतून अटक 

  औरंगाबाद – शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले. त्यानंतर आता सदावर्ते यांच्या एका सहकाऱ्याला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. एसटी आंदोलनात गुणरत्न सदावर्ते यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीला औरंगाबादेतून अटक झाली आहे. एसटी कर्मचारी अजय गुजर असे … Read more

औरंगाबाद शहरातील प्रत्येक वॉर्डात हनुमान चालीसा पठण करणार; मनसेचा निर्धार 

औरंगाबाद – राज्यात सध्या भोंगे आणि हनुमान चालीसाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान आज हनुमान जयंती आहे. औरंगाबाद शहरातील प्रत्येक वॉर्डात हनुमान चालीसा पठण करणार, तसेच जर हिंदुस्थानात हनुमान चालीसा म्हणायचं नाही तर कुठे म्हणायचं असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांची उपस्थित केला आहे. सध्या राज्यात भोंगे आणि हनुमान चालीसा यावरुन चांगलेच राजकारण तापले … Read more

761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची कोरोनापासून सुटका 

Corona

  औरंगाबाद – कोरोना महामारी पासून तब्बल 761 दिवसांनंतर औरंगाबादकरांची सुटका झाली आहे. काल जिल्ह्यात तीन कोरूना रुग्णांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आज जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण शिल्लक राहिला नाही. नव्याने आढळून येणारे रुग्णही गेल्या सहा दिवसांपासून शुन्यच आहेत. 15 मार्च 2020 रोजी शहरात धोरणाने शिरकाव केला. त्यानंतर शहरात कोरोनाचा उद्रेक … Read more

जालना-औरंगाबादहून नवीन वर्षात धावणार इलेक्ट्रिक इंजिन

railway

औरंगाबाद – मनमाड (अंकाई) ते रोटेगाव रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान 5 महिन्यांत म्हणजे सप्टेंबरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल. तर औरंगाबाद ते जालना दरम्यान फेब्रुवारी 2023 पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे पुढील वर्षी जालन्याहून इलेक्ट्रिक इंजिन असलेली रेल्वे धावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्रीय रेल्वे विद्युतीकरण … Read more

उन्हामुळे सकाळच्या सत्रात भरणार शाळा 

औरंगाबाद – उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी घेतला आहे. एका सत्रात भरणाऱ्या शाळा सकाळी 7: 30 ते 11:30 पर्यंत, तर दोन्ही सत्रात भरणाऱ्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार नियोजित अध्यापनाच्या तासिका आज बदल होणार नाही. तसेच … Read more

अखेर ‘त्या’ किर्तनकार बाबावर गुन्हा दाखल

औरंगाबाद – समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबतची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या त्या महाराजासह महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मोगल (वय 48, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे. साधारण चार दिवसांपूर्वी बाळकृष्ण माेगल याच्यासोबत समव्यावसायिक 40 वर्षीय महिलेची अश्लील चित्रफीत गंगापूर, वैजापूर तालुक्यात व्हायरल झाली … Read more

दंगल पेटवणारे उच्चवर्गीय ब्राह्मण असतात; आंबेडकरांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता

sujat ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असं वादग्रस्त वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात एका कार्यक्रमात सुजात आंबेडकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची … Read more