औरंगाबादेत 27 वर्षीय तरुणाची भोसकून हत्या; पोलिस‍ांकडून 12 तासात संशियितांना बेड्या

औरंगाबाद प्रतिनिधी |  किरकोळ वादानंतर तीन आरोपीनी 27 वर्षीय तरुणाला भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास औरंगपुरा भागातील पिया मार्केट जवळ घडली. सीसीटीव्ही च्या मदतीने रात्री उशिरा सिटीचौक पोलिसांनी तीन संशयित आरोपिना अटक केली. समीर खान सिकंदर खान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समीर हा औरंगपुरा भाजी मंडई जवळील … Read more

म्हणून ‘तो’ बनला रिक्षा चालक, आठ ते दहा रिक्षांची केली चोरी

औरंगाबाद प्रतिनिधी । व्यवसायासाठी रिक्षा चालवायला दिली नाही म्हणून एक तरुण चक्क रिक्षा चोर बनला, त्याने आतापर्यंत शहरातील 8 ते 10 रिक्षा चोरल्या आहेत. विशेष म्हणजे तो चोरी केलेल्या रिक्षावरच प्रवासी बसवून धंदा करायचा. त्याला अशाच एका चोरी प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी वाळूज परिसरातून अटक केली आहे. संदीप काशीनाथ वाकळे असे आरोपीचे नाव आहे. … Read more

राज्यात ‘या’ जिल्ह्यांत होतोय कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’

मुंबई । कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा ‘ड्राय रन’ (Dry Run) म्हणजेच रंगीत तालीम आज (शनिवारी) पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या ४ जिल्ह्यातील प्रत्येकी ३ आरोग्य केंद्रांवर होणार असून, प्रत्येक केंद्रांवर २५ जणांना त्यासाठी निवडण्यात आले आहे. त्यामध्ये केवळ प्रत्यक्ष लस न टोचता लसीकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. केंद्राकडून देशात’ सिरम’च्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन … Read more

औरंगाबादनंतर अहमदनगरच्या नामांतरासाठी शिवसेनेनं सुचवलं ‘हे’ नाव

अहमदनगर । गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरु लागली असतानाच आता अहमदनगरचे नाव बदलण्याचा मुद्दा शिवसेनेनं उपस्थित केला आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार लोखंडे यांनी ही मागणी केली. ‘औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. … Read more

आघाडीत ठिणगी! औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याला आमचा विरोध – बाळासाहेब थोरात

मुंबई । औरंगाबादचं नाव बदलून ते संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असताना आता महाविकास आघाडीतील घटक असलेल्या कॉंग्रेसने याला विरोध केला आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये नाव बदलण्याचा समावेश नसल्याचं कॉंग्रेसनं स्पष्ट केलंय. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतरणाला विरोध करताना म्हटलं की, “संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास … Read more

‘मी ते सोडवणारच’ सांगून मुंबईला निघून जायचं ही ठाकरेंची पद्धत; निलेश राणेंनी साधला निशाणा

Nilesh rane and uddhav thakarey

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजना व बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व सफारी पार्क तसंच अन्य योजनांचा शुभारंभ करण्यात आला. ‘मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगानं करायचा आहे. फक्त भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाहीये. काम पूर्ण करायला आलोय,’ असं ठाम आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

औरंगाबादमध्ये मंत्री विजय वडेट्टीवारांच्या बैठकीत तुफान ‘राडा’, कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची

औरंगाबाद । राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या औरंगाबादमधील बैठकीत जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विजय वडेट्टीवार यांची औरंगाबादमध्ये बैठक सुरु असतानाच काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी समाजासाठी काय … Read more

शहरातून विवाहिता झाली बेपत्ता ; माहेरच्या मंडळींनी सासरच्यांना बदडले

Crime

औरंगाबाद | विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना घडली ही माहिती मिळताच मुलीच्या घरच्या मंडळींनी क्रूझर गाडी मधून शहरात येऊन मुलीच्या सासरच्या मंडळींना बदडले. पुंडलीक नगर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. तर बेपत्ता असलेल्या विवाहितेचा पोलीस शोध घेत आहे. शिवकण्या राजेश … Read more

भयंकर! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न; नराधमच्या चाव्याने मुलीचा ओठ तुटला

औरंगाबाद । औरंगाबादमध्ये बलात्काराची अंत्यत धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. अंगाचा थरकाप उडवणारी बाब म्हणजे नराधम आरोपीने पीडितेच्या ओठांचा चावा घेतल्याने मुलीचा ओठ तुटला असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (rape on 7 year old girl … Read more

अब्दुल सत्तार राजीनामा द्या; किसान करणी सेना

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या मुलाला शिवीगाळ केली शेतकऱ्याच्या मुलाने मराठा आरक्षणाविषयी व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून कधी नुकसान भरपाई मिळणार असे विचारले असता महाविकास आघाडीचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरसभेत शिवीगाळ केली त्याच्या निषेधार्थ सिल्लोड येथे करणी सेनेच्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more