धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा १४ वा बळी; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कालपर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात आज पुन्हा रामनगर येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा १४ वा बळी गेला आहे. अशी माहिती माध्यम समन्वयक अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. रामनगर येथील ८० वर्षीय … Read more

औरंगाबादमध्ये कोरोनाबांधितांची संख्या ६०० पार, आज ४४ जणांचा अहवाल पॉजिटिव्ह

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात कोरोनाबधितांची संख्या पाहता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहराचा कोरोनाबधितांचा अहवाल पाहिला तर काल रात्रीपर्यंत ५५८ कोरोनाबधितांची संख्या होती. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ४४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबधितांची संख्या ६०२ वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. औरंगाबादचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस … Read more

मध्यप्रदेशच्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या ; खासदार इम्तियाज जलील यांचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | मध्यप्रदेशच्या त्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या कऱण्यात आली आहे. असा खळबळजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज यांनी केला आहे. शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये रेल्वेच्या पटरीवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी खाली येवून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी दुपारी या घटना स्थळावर जाऊन घटनेची पाहणी केल्यानंतर … Read more

औरंगाबादमध्ये मालगाडीने १६ कामगारांना चिरडले, रेल्वे रुळावर झोपणं जीवावर बेतलं

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

९० टक्के लोकांना होणारा कोरोना हा साधा तापच – डॉक्टर येळीकर

औरंगाबाद प्रतिनिधी । 90 टक्के लोकांना कोरोनामुळे कोणताही सिरीयस आजार होत नसून तो साध्या फ्लू सारखा आहे. पंधरा दिवसानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो म्हणून नागरिकांनी त्याला न घाबरता घरीच बिनधास्त रहावं असं आवाहन डॉक्टर कानन येळीकर यांनी केलं आहे. पाहुयात त्या काय म्हणतायत.. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/232839194608439

३० मे पर्यंत औरंगाबाद मधून कोरोनाला हद्दपार करु – महापालिका आयुक्त

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील नागरिकांनी आम्हाला साथ दिली तर आम्ही 30 मे पर्यंत कोरोनाला शहरातून हद्दपार करू असा विश्वास महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबादेतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर ते आज बोलत होते. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त की. शहरात फक्त 36 मूळ कोरोना संक्रमित रुग्ण असून शहराचे नागरिक त्यांच्या संपर्कात आल्यामुळे … Read more

कोरोना हाहाकार ! औरंगाबादेत कोरोनाचा दहावा बळी

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरातील कोरोना बाधित असलेल्या 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा जिल्ह्यातील कोरोनाचा हा १० वा बळी आहे. या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या या रुग्णाचा रविवारी रात्री 11 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन … Read more

‘या’ कारणामुळे औरंगाबाद शहरात झपाट्याने वाढतायत कोरोनाचे रुग्ण

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील तीन दिवसांत शहरातील रुग्णसंख्या तिपटीने वाढल्याने अनेकांना यामुळे काळजी वाटू लागली आहे. मात्र जास्त कोरोना चाचण्या झाल्यामुळे रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचा खुलासा मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी केला आहे. प्रति दहा लाख व्यक्तीमागे भारतात मुंबईनंतर सर्वात जास्त टेस्ट औरंगाबाद … Read more

औरंगाबादेत आज पुन्हा १४ जण कोरोना पोझिटिव्ह, एकुण रुग्णसंख्या १४४ वर

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. औरंगाबाद शहर मागील काही दिवसांपासून कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले असून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज औरंगाबादेत कोरोनाचे आणखी १४ नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या १४४ वर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सापडलेल्या रुग्णांमध्ये भीमनगर येथील ६, किलेअर्क १, आसिफिया कॉलनी २, … Read more

२४ तासात औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दुपटीने वाढ; एकूण रुग्णसंख्या १०५ वर

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत लक्षणीय वाढ झाली आहे. २४ तासांत शहरात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असून, सध्या जिल्ह्यात एकूण १०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. या बाधितांमध्ये पाच वर्षांपासून ते ९५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व बाधित शहर परिसरातील आहेत. शहरात सोमवारी (२७ एप्रिल) दुपारपर्यंत बाधितांचा आकडा ५३ होता. मात्र सोमवारी … Read more