Wednesday, June 7, 2023

मध्यप्रदेशच्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या ; खासदार इम्तियाज जलील यांचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | मध्यप्रदेशच्या त्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या कऱण्यात आली आहे. असा खळबळजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज यांनी केला आहे. शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये रेल्वेच्या पटरीवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी खाली येवून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी दुपारी या घटना स्थळावर जाऊन घटनेची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.

दरम्यान जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर औरंगाबादहून गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पायी निघाले होते. रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून रेल्वे रुळावरच त्यांनी पथारी पसरली आणि झोपी गेले. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”