‘कामाची फाईल थांबली तर तुमची नोकरी थांबली’; मंत्री बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी

“माझ्या खात्याच्या अंतर्गत येणारी कोणतीही फाईल विनाकारण थांबली तर त्या अधिकाऱ्याची नोकरी थांबली समजा ” अशा खड्या शब्दात राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांनी अधिकाऱ्यांना दम दिला. बच्चु कडु आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या विभागांची एकत्रित बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

मंत्रीपद गेलं तरी बेहत्तर मात्र कामचुकारांची खैर नाही – बच्चू कडू

बच्चू कडू यांना चालू मंत्रिमंडळात बऱ्याच जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. जवळपास ४ विभागातील राज्यमंत्रीपद सांभाळण्याची जबाबदारी आलेल्या बच्चू कडू यांनी यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

अब्दुल सत्तारांना ग्रामविकास तर बच्चू कडूंना शालेय शिक्षण व कामगार; पहा संपूर्ण खातेवाटप

मुंबई | कृषी खाते कोणाकडे जाणार यावरून काँग्रेस व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आणि शिवसेनेचे दादा भुसे कृषी मंत्री झाले. खाते वाटपा संबंधी अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेली यादी अंतिम मानली जात आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना कोणते खाते मिळाले हे अद्याप स्पष्ट झाले नसले … Read more

लढवय्ये बच्चूभाऊ बनले मंत्री, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला पेढे वाटून आनंद साजरा

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे सलग चार वेळा आमदार म्हणुन निवडून आलेले प्रहारचे आमदार, दिव्यांगाचे मसिहा ओळख असलेले आणि शेतकरी प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन करणारे दबंग आमदार बच्चू कडू यांनी आज राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी आशिष गवई येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रहारचे कार्यकर्ते ऊपस्थित होते.

ज्येष्ठांना डावलून ‘या’ तरुण चेहर्‍यांना मिळणार मंत्रीपद, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी

मुंबई | उद्या 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. शिवसेनेच्या खात्यातून बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाईल. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेल्या अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी निश्चित समजली जाते. … Read more

जिल्हापेक्षा तालुकाच मोठा! बच्चू कडूंच्या प्रयत्नातून तालुका क्रीडा कार्यालयानं केलं जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट

मतदारसंघातील अचलपूर तालुका क्रीडा कार्यालयाने आज जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट दीले आहे. त्यामुळे आता “जिल्हापेक्षा तालुकाच मोठा” ही म्हण आज खरी झालेली आहे. अमरावती जिल्हा क्रीडा कार्यालयाला जिल्हाभर खेळांच्या नियोजनासाठी तसेच विविध स्पर्धेवेळी वेळेवर ऊपस्थित राहण्यासाठी स्वतःचे वाहन ऊपलब्ध नव्हते. त्यामुळं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यक्रमाला ऊशिरा कींवा अनुपस्थित राहत होते.

बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात, शेतकऱ्यांचे आंदोलन प्रशासनाने दडपलं

राज्यात अतिवृष्टीमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. या पावसानं संपूर्ण खरीप हंगामातील सर्व पिकांचे नुकसान केलं आहे. अशा परिस्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू यांनी विधानभवन परिसरात आंदोलन पुकारले होते. मात्र, पोलिसांनी विधानभवन परिसरात आंदोलनकाना अडवत आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं.

बच्चू कडू अचलपूरमधून आघाडीवर; निकालाची धाकधूक कायम

अचलपूर मतदार संघाची पाचवी फेरी पूर्ण झाली आहे. या फेरीनंतर शिवसेना भाजपा यूतीच्या उमेदवार सूनीता फिसके यांना 2223 मिळाली आहे . तर कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबलू ऊर्फ अनिरुद्ध देशमूख यांना 2743 मिळाली आहे. प्रहार अपक्ष उमेदवार बच्चु ऊर्फ ओमप्रकाश कडू 3032 हे मतांनी सध्या आघाडीवर आहेत. निकाला गणिक धाकधूक वाढत आहे.

‘सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही संडास देते’ – आमदार बच्चू कडू

गडचिरोली प्रतिनिधी। महाराष्ट्रात साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी पण सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देत नाही. कश्मीरसारखी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती झाली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही तर देते काय? संडास! अशी जळजळीत टीका प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर केली. चिमूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. … Read more

अचलपूरमध्ये विधानसभेसाठी बच्चू कडू विरुद्ध बाकी सगळे

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई 14 तालुक्यांच्या अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी, धामणगाव यांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी समर्थक उमेदवार नवनीत राणा यांनी विजय मिळवला. त्यामुळे एकाच घरात आमदार आणि खासदार असं चित्र अमरावतीत आहे. या दोघांची ताकद येत्या विधानसभा निवडणुकीत कुठले … Read more