शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लिट पदवी

औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, व केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डि.लिट पदवी देण्यासाठी राजभवनाने परवानगी दिली होती. त्यानंतर नियमानुसार शुक्रवारी व्यवस्थापन बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर निर्णय झाल्याने आता अधिसभेच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. … Read more

ठरलं तर! विद्यापीठात ‘या’ तारखेपासून लागणार उन्हाळी सुट्टया 

bAMU

  औरंगाबाद – गेल्या आठवडाभरापासून विद्यापीठात उन्हाळी सुट्ट्यांचा विषय गाजत होता. अखेर काल कुलगुरूंनी प्राध्यापकांसाठी 21 मे पासून सुट्टीचा निर्णय जाहीर केला. नियोजित वेळापत्रकानुसार 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या तारखेत बदल केला असून, आता महाविद्यालय 9 जुलै पासून तर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग 27 जून पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   यंदा … Read more

विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर ऑफलाईन परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार 

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षेची तयारी सुरू केली असून, 1 जून पासून पदवी तर 21 जून पासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा ऑफलाइन अर्थात केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑनलाइन … Read more

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा जूनअखेरपासून

bAMU

औरंगाबाद – मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन परीक्षेत उडणारा विद्यार्थ्यांचा गोंधळ आता थांबणार आहे. जून अखेर पासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी होम सेंटरची सुविधा असणार नाही. विद्यापीठाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील. कोरोना काळात विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. चालू शैक्षणिक वर्षातील … Read more

संशोधक विद्यार्थीनीकडून 50 हजार मागणाऱ्या विद्यापीठातील ‘त्या’ प्राध्यापिका निलंबित

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुखाकडून गाईडसाठी संशोधक विद्यार्थिनीकडे 50 हजारांची लाच मागण्यात आल्याची एक ऑडीओ क्लिप बुधवारी समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. डॉ. उज्वला भडंगे यांनी शिक्षणशास्त्र विषयामध्ये संशोधन … Read more

विद्यापीठात कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. विद्यापीठात सोमवारी अधिसभेची बैठक होती. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर तिन्ही महापुरुषांच्या नावाचा जयघोष झाला. त्यानंतर निषेधाच्या घोषणा झाल्या. त्यानंतर … Read more

विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

bAMU

औरंगाबाद – शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सन 2021-22 या चालू शैक्षणिक वर्षाचा हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची तयारी केली असून, 8 फेब्रुवारी पासून पदवी तर 22 फेब्रुवारीपासून पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक … Read more

विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन अकरा दिवसांनी स्थगित

bamu

औरंगाबाद – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना व सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असून, सदरील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. असे आश्वासन दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यभरातील सर्व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काल अकराव्या दिवशी बेमुदत संप स्थगित केला आहे. कर्मचारी आजपासून नियमितपणे कामावर रुजू होणार … Read more

औरंगाबादेत होणार जिनोमिक सिक्वेंसिंग तपासणी; विद्यापीठातील लॅबमुळे वाचणार चार कोटी

औरंगाबाद – ओमायक्रॉन व्हेरियंटच्या निदानासाठी आवश्यक जिनाेमिक सिक्वेंसिंगसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक साहित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लॅबमध्ये उपलब्ध आहे. या लॅबची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी समिती स्थापन केली आहे. विद्यापीठातील लॅबमध्येच ओमायक्रॉनच्या चाचण्या केल्या तर सुमारे 4 कोटी 22 लाख रुपये वाचणे शक्य आहे. नव्याने लॅब सुरू करण्यासाठी सर्व साहित्य खरेदी करावे … Read more

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थी वेठीस

bamu

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने आक्रमक पवित्रा घेऊन मंगळवारी चौथ्या दिवशीही विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप कायम ठेवला आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे विद्यार्थ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. यामुळे एक प्रकारे विद्यापीठानेच विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघाने बेमुदत संपाला 18 … Read more