दिवसभरात बीड जिल्ह्यात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू; रुग्णसंख्या ३५४ वर

परळी प्रतिनिधी | अंबाजोगाईसह बीड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यासोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी अवघ्या एका दिवसात बीड जिल्ह्यातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १७ व्यक्तींचा बळी घेतला आहे.गेवराई शहरातील फुलेनगर, माळीगल्ली या भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत १८ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात … Read more

फक्त हे करा! माझ्यासाठी त्याच यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा- धनंजय मुंडे

बीड । बीड जिल्ह्यासह राज्यावर कोरोना महामारीचे सावट असल्यानं कोणाही माझा वाढदिवस साजरा करू नये, असं भावनिक आवाहन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी हे आवाहन केलं आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं कि,”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका. बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर करोनाच्या संकटाचे सावट … Read more

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; बुधवारी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्याने खळबळ

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य  कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. धनंजय मुंडे … Read more

बीडमध्ये कोरोनाच्या भीतीमुळे 65 वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड । संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. वृत्तवाहिन्या, स्मार्ट फोन वर येणाऱ्या कोरोना संबंधीच्या बातम्या यातून काही जण सतर्क होत आहेत तर काही भयग्रस्त होत आहेत. लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण होण्याचं दुसरं कारण म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास सामाजिक बहिष्कार होण्याची भीती. त्यातून अनेकांच्या मनात या कोरोनाविषयीचा भयगंड निर्माण झाला आहे. अशातच कोरोनाला … Read more

ए रोहितदादा, आमच्या गावातून पण कोरोना घालव ना..!! चिमुकलीचं रोहित पवारांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात अनेक योध्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत कोरोनाशी लढाई यशस्वी केली. डॉक्टर, पोलीस, इतर आरोग्यसेवक आणि सामान्य नागरिकसुद्धा या लढाईत प्राणप्रणाने लढत आहेत. कोरोनामुक्तीचा वेगळा पॅटर्न विविध लोकप्रतिनिधी आपापल्या भागात राबवत आहेत. अशाच एका अनोख्या पॅटर्नची गरज आपल्या गावात असल्याची गरज एका चिमुकलीने बोलून दाखवली आहे. मृण्मयी विकास म्हस्के … Read more

ऊसतोड मजूरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा पण…

मुंबई । ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय करावी याकरिता बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मजुरांना टप्प्याटप्य्याने प्रवास करायचा आहे. ऊसतोड मजूर ज्या ज्या जिल्ह्यांत आहेत तेथील सदर ऊस कारखान्याचे एमडी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी … Read more

प्रितमताईंना शोधा १ हजार रुपये मिळवा, खासदार प्रितम मुंडेंना बीडच्या तरुणाचे खूलेपत्र

बीड प्रतिनिधी । भाजप खासदार प्रीतम मुंडे मतदार संघातील समस्यांकडे लक्ष देत नाहीत अशी तक्रार करत एका तरुणाने मुंडे यांना खुले पत्र लिहिले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावित खासदार प्रीतम मुंडे मतदार संघात नसल्याने निदान आता तरी प्रीतमताईंनी बीडला यावे असे आवाहन सदर युवकाने केले आहे. अक्षय मुंडे नावाच्या युवकाने फेसबुकवर हे पत्र पोस्ट केले … Read more

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडताय, तर सावधान! तुमच्यावर अशी वेळ येऊ नका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोनाचा मुक्काम दिवसेंदिवस वाढतच आहे. या न बोलावलेल्या जीवघेण्या पाहुण्याला लवकरात लवकर महाराष्ट्रातून घालवण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्स, प्रशासन जीवाचं रान करत आहेत. या कोरोनाने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढू नये म्हणून सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. तो केवळ तुमच्या काळजीपोटी, तुमचा जीव जाऊ नये म्हणून. घराबाहेर पडू नका रे बाबांनो! … Read more

अंबाजोगाई तालुक्यात १२ व्यक्तींना अन्नातून विषबाधा

बीड प्रतिनिधी । एकाच किराणा दुकानातून भगर (वरी तांदूळ) खरेदी केलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील एकूण १२ व्यक्तींना भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली. सर्व बाधितांवर सध्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आपेगाव, सारसा आणि देवळा या गावातील तीन कुटुंबातील व्यक्तींना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी या कुटुंबांतील व्यक्तींनी आपेगाव येथील एका किराणा … Read more

बीडच्या वृक्षसंमेलनात क्रांती बांगर ठरली वृक्षसुंदरी

बीड प्रतिनिधी । सह्याद्री-देवराई वनप्रकल्प येथे आयोजित पहिल्या वृक्षसंमेलनाचा समारोप शुक्रवारी (ता. 14) अभिनेते सयाजी शिंदे व पटकथा लेखक अरविंद जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. संमेलनात 11 ठराव संमत करण्यात आले. क्रांती बांगर हिने वृक्षसुंदरीचा किताब पटकाविला. शैलेंद्र निसर्गंध यांच्या ओसाड माळरानी फुलली ही देवराई या गीताने सुरवात झाली. श्रीकांत इंगळहडीकर यांचे दुर्मिळ वनस्पती, पोपट … Read more