Sunday, January 29, 2023

भरधाव वेगाने येणाऱ्या ग्रामसेवकाच्या कारने सहा वर्षीय मुलाला उडविले

- Advertisement -

बीड प्रतिनिधी | शेख अनवर

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने एका सहा वर्षीय मुलाला उडविले आहे. या अपघातात सहा वर्षीय मुलगा कृष्णा मंचरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

सविस्तर असे की कृष्णा संजय मंचरे वय (०६) मुलगा हा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येत असलेल्या ग्रामसेवक योगेश शेळके यांच्या चारचाकी कारणे कार क्र.एम. एच.१२ एम.बी. ४३९१ या कार ने उडविले. यामध्ये कृष्णा संजय मंचरे हा मुलगा गंभीर जखमी झाला असून कार चालक ग्रामसेवक योगेश शेळके हे किरकोळ जखमी झाले आहेत.

ग्रामसेवक योगेश शेळके हे आपल्या कारने गेवराई हुन माजलगाव कडे जात असताना हा अपघात हायवे क्र.(६१) वर सिरसदेवी पासून जवळच असलेल्या पेट्रोल पंपाजवळ गेवराई माजलगाव रोडवर झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.