भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पहिला जामीन मंजूर; अखेर वरवरा राव यांची सुटका

मुंबई । भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी ज्येष्ठ कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मानवतेच्या आधारावर अंतरिम जामिनावर देत असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. वाढतं वय, ढासळती तब्येत याच्या पार्श्वभूमीवर एक कैदी म्हणून त्यांना असलेला अधिकार याचा विचार करता 50 हजारांच्या वैयक्तिक जामिनावर केवळ ६ महिन्यांसाठी सुटका करण्याचे निर्देश … Read more

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा! लवकरच मिळणार पदोन्नती

मुंबई | भरतीमध्ये आरक्षण असल्यानंतर पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जात होते. पण 2017 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले गेले होते. त्यानंतर आता शासनाने एक जीआर काढून पदोन्नतीच्या जागा भरल्या जाऊन, तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येण्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. श्री. घोगरे यांनी सर्व स्तरावरील … Read more

पॉक्सो कायद्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ न्यायाधिशांना कंडोमची पाकिटे भेट

नवी दिल्ली | पॉक्सो कायद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पुष्पा गाणेडीवाल यांनी दिलेल्या निर्णयावर मध्यंतरी बराच वाद झाला. या निर्णयांमध्ये न्यायमूर्ती गाणेडीवाल यांनी असे म्हटले होते की, ‘मुलीने कपडे घातले असताना तिच्या छातीला स्पर्श करणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नाही’. त्यांच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक कायदे तज्ञांनी आणि सोशल मीडियावर त्यांच्या … Read more

कंगनानं घेतलं नमतं; BMCकडे करणार ‘ही’ विनंती

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि मुंबई महापालिका (BMC) यांच्यातील वाद आता काही प्रमाणात शमण्याची चिन्हे आहेत. खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी BMC नं सुरु केलेल्या कारवाई विरोधातील याचिका कंगनानं अखेर मागे घेतली आहे. याशिवाय सदर बांधकाम नियमित करून घेण्याची विनंती कंगना BMC कडे करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगनानं मुंबईतील खार भागात … Read more

इंद्राणी मुखर्जीचा वैद्यकीय कारणासाठीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालत दाखल

मुंबई | संपत्तीच्या हव्यासापोटी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. इंद्राणी मुखर्जी यांनी याच संपत्तीसाठी आपल्या मुलीचा जीव घेतला, असा आरोप त्यांच्यावर आहे. आता आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी आरोग्याच्या कारणासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. पण त्याला सीबीआयने विरोध दर्शवला आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी या मुख्य आरोपी आहेत. … Read more

शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही – हायकोर्ट

नागपूर । नागपुरात २०१६ साली घडलेल्या लैगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं महत्त्वाचे निरीक्षण नोंदवल आहे. शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल आहे. ज्यावेळी लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला तरच तो लैंगिक अत्याचार होऊ शकतो, असंही कोर्टानं नमूद केलं … Read more

एकनाथ खडसेंना दिलासा; EDने हायकोर्टात दिली ‘ही’ हमी

मुंबई । सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. येत्या सोमवारपर्यंत खडसे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी हमी ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात  (Bombay High Court) दिली आहे. फडणवीस सरकारच्या काळात पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमुळं खडसे वादात सापडले होते. त्यातून … Read more

प्रौढ तरुणीला जोडीदार निवडण्याचा अधिकार; हायकोर्टने प्रेमी जोडप्याला आणले एकत्र

मुंबई । ‘प्रौढ तरुणीला तिचा आयुष्यभराचा साथीदार निवडण्याचा व त्याच्याशी विवाह करण्याचा अधिकार आहे. तिच्या या अधिकारावर व स्वातंत्र्यावर तिचे पालक किंवा न्यायालयही गदा आणू शकत नाही’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका जोडप्याला मंगळवारी पुन्हा एकत्र आणले. ‘प्रेयसीसोबत मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंधित आहेत. माझे शिक्षण पूर्ण होताच तिच्यासोबत विवाह करण्याचे माझे नियोजन होते. … Read more

अर्णव गोस्वामींनी TRP वाढविण्यासाठी दिली लाखोंची लाच; मुंबई पोलिसांचा कोर्टात खुलासा

मुंबई । (TRP Scam) टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) अहवाल सादर केला. रिपब्लिक टेलिव्हीजन नेटवर्कचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP) वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलचे (BARC) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात केला आहे. मुंबई पोलिसांच्या … Read more

ठाकरे सरकारला झटका! कांजूरमार्ग मेट्रोशेडचं काम तत्काळ थांबवा; हायकोर्टाचे निर्देश

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या मुंबईमेट्रोच्या कांजूरमार्गमधील कारशेडच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे आदेश मुंबई हायकोर्टाने एमएमआरडीएला दिले आहेत. सध्या या भूखंडावरील काम जैसे थे ठेवावे असे हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, असे हायकोर्टाने … Read more