पुन्हा झटका! अर्णव गोस्वामींचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला; ‘जेल’वारी लांबली

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात अटकेत असलेले पत्रकार अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे. कोर्टानं त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता अर्णव यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. तसेच सत्र न्यायालयातून जामीन मिळेपर्यंत त्यांना तळोजा तुरुंगातच राहावं लागणार आहे. अर्णव गोस्वामी यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर … Read more

बाबरी केस पासून अनेक खटले मी अंगावर घेतले, हा तर.. ; राऊतांचे कंगनाला चोख उत्तर

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि मुंबई महापालिका प्रकरणावर उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. कंगनाने मुंबई महापालिकेकडून आपल्या कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत कंगनाकडून कारवाईचा आदेश देणारा अधिकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारपर्यंत संजय राऊत आणि अधिका-यांना बाजू मांडण्याचे … Read more

कंगनाला मुंबई हायकोर्टाचा दिलासा! कार्यालयावरील कारवाईला दिली तात्पुरती स्थगिती

मुंबई । कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असुन सुनावणीला सुरुवात जाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला … Read more

मुंबई |  मुंबई हायकोर्टानं 65 वर्षावरील कलाकार, टेक्निशियन आणि संबंधितांना कामाची परवानगी दिली आहे. कोरोना लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्र सरकारने चित्रपटांच्या शूटिंग संबंधित एक गाईडलाइन जारी केली होती. आता मात्र मुंबई हायकोर्टाने सरकारच्या गाईडलाइनमध्ये बदल करून 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात शूटिंगबाबत महाराष्ट्र सरकारने गाईडलाइनसोबत शूटिंगला परवानगी दिली होती. मात्र, 65 वर्षांवरील कलाकार, … Read more

अर्णब गोस्वामीला हायकोर्टाचा झटका! चौकशीला हजर राहण्याचे दिले आदेश

मुंबई । रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चौकशीला बोलावल्यानं त्याविरोधात गोस्वामी यांनी तातडीनं याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानं अर्णब गोसस्वामीने चौकशीला न जाण्यासंदर्भांतील दिलेली कारण फेटाळून लावत मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चौकशीसाठी … Read more