धक्कादायक ! सांगलीत निवृत्त पोलिसाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

suicide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमध्ये एका निवृत्त पोलिसाने नदीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. त्यांनी कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली. अशोक नामदेव कांबळे असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्याच आठवड्यात जिल्हा न्यायालयाने लाच घेतल्याप्रकरणी एक वर्ष सक्तमजुरीची … Read more

तहसिल कार्यालयातील कारकूनास सक्तमजुरी, शेतकऱ्याकडून 10 हजारांची लाच

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव तालुक्यातील तहसील कार्यालतील कारकूनाला लाच घेतल्याप्रकरणी सातारा न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सुलतानवाडी येथील जमिनीसंदर्भात सुरू असणारी कायदेशीर प्रक्रिया निकाली काढण्यासाठी 10 हजारांची लाच घेतली होती. प्रवीण रघुनाथ कुंभार (रा. कोरेगाव) असे शिक्षा झालेल्या कारकूनाचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, कोरेगाव तहसीलदार कार्यालयात प्रवीण कुंभार महसूल कारकून … Read more

पाटखळच्या ग्रामसेवकास लाच घेताना पकडले

froud

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पाटखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पाटखळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दीपक मानसिंग देशमुख (वय- 51, रा. शाहूपुरी) असे त्याचे नाव आहे. संबंधित तक्रारदार यांनी पाटखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील खड्डे काढून पाइपलाइनच्या गळतीचे, तसेच शौचालय टाकी साफ करण्याचे काम केले … Read more

लातूरमध्ये दीड लाखांची लाच घेताना तहसिलदाराला अटक

Bribe

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी चक्क तहसिलदाराने महिना 30 हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली आहे. तब्बल दीड लाखांची लाच (Bribe) घेताना तहसीलदाराच्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. निलंगा तालुक्यात वाळूचा धंदा सुरू ठेवण्यासाठी तहसीलदाराने लाच (Bribe) मागितल्याचा प्रकार समोर आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ … Read more

सातारा पालिकेत 5 हजारांची लाच घेताना दोन कर्मचारी जाळ्यात

Satara Municipal

सातारा | सातारा पालिकेच्या वसुली विभागाच्या दोन मदतनीसांनी तक्रारदाच्या घराची घरपट्टी शासनाच्या नवीन नियमानुसार आकारणी करण्यसाठी 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच घेताना लाचलुचपतच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता महसूल विभागाच्या दालन परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत विभागाचे अतिरिक्त पोलिस उपअधीक्षक सुजय घाडगे यांनी दिलेली माहिती … Read more

मनपाच्या नगररचना विभागातील प्रभारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात; नागरिकांनी फोडले फटाके

औरंगाबाद – महापालिकेतील बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेला नगररचना विभागातील प्रभारी अभियंता तथा गुंठेवारी कक्ष प्रमुख संजय चामले याला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तक्रारदार बिल्डरकडे लेआऊट मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिल्या हप्त्यापोटी 3 लाख स्वीकारताना पकडण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेतील भ्रष्टाचाराचे … Read more

वारसाची नोंद करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या नगरभूमापन कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. वारसाची नोंद करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना एका एजंटला रंगेहात पकडण्यात आले. या कार्यालयात तक्रारदार यांच्या वारसाची नोंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच द्यावी लागते, असे सांगून तडजोडी अंती 3 हजार रुपये घेताना पकडले. प्रमोद काशिनाथ शिंदे असे अटक … Read more

कराडला लाच घेताना महिला गृहपाल एसीबीच्या जाळ्यात

कराड | सासूच्या मृत्यूनंतर सासऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन मिळावी म्हणून सूनेने केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील मुलींच्या शासकीय वस्तीगृहाच्या महिला गृहपाल हिला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. रत्नमाला रामदास जाधव असे लाच स्विकारणाऱ्या गृहपाल महिलेचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सासुबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांचे … Read more

दहावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी मागितले 30 हजार रुपये; संस्थाचालकास अटक

औरंगाबाद – शिक्षणतज्ञ, संस्थाचालक एस.पी. जवळकर याने दहावीच्या विद्यार्थ्याला हॉलतिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी 30 हजार रुपये मागितले. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात एस.पी. जवळकर हे दहा हजार रुपयांची लाच घेताना शाळेतच रंगेहाथ पकडले गेले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कलावती देवी चारीटेबल ट्रस्ट चे … Read more

सातबार्‍यावरील नाव बदलासाठी लाच मागणारे नायब तहसीलदार अन् महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गोटखिंडी येथील एका शेतकर्‍याकडे सातबारा उतार्‍यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना येथील अप्पर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बाजीराव राजाराम पाटील व महसूल सहाय्यक, सुधीर दीपक तमायचे यांना सांगलीतील लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. गोटखिंडी येथील एक शेतकरी यांनी त्यांच्या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर राजपत्राप्रमाणे … Read more