राम गोपाल वर्माच्या कोरोनावरील जगातील पहिल्या सिनेमाचा ‘ट्रेलर व्हायरल’

मुंबई । कोरोनाच्या विळख्यातून जगाची सुटका कधी होईल याचं उत्तर सध्या कोणाकडेही नाही आहे. आपल्या देशात कोरोनाच्या रुग्णांची सध्या झपाट्यानं वाढत आहे. इतकंच नाही सोशल डिस्टन्सिंग अजूनही गांभिर्यानं घेतलं जात नाही आहे. याच विषयावर प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली असून याचा ट्रेलरही लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचं नावही ‘कोरोना … Read more

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता दीड लाख पार तर मृत्यूदरात घट

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा दीड लाख पार पोहोचला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, देशाचा रिकव्हरी रेट 41.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंगळवारी २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६३८७ ने … Read more

ये भैय्या बताइयें वॅक्सीन कब आयेगी? राहुल गांधींचा आशिष झा यांना प्रश्न 

वृत्तसंस्था । कोरोना विषाणूच्या या वाढत्या प्रादुर्भावात माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सतत कर्यरत दिसत आहेत. ते ठिकठिकाणी लोकांना भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. तसेच वेगवेगळ्या तज्ज्ञांशी ही ते व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बोलत आहेत. त्यांनी भारतीय वंशाचे अमेरिकेतील स्वास्थ्य विशेषतज्ञ आशिष झा यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राहुल … Read more

रशियामध्ये कोरोना विषाणूची सुमारे ९००० नवीन प्रकरणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सुमारे ९००० नवीन घटना समोर आल्या आहेत. यामुळे इथे संक्रमित लोकांची संख्या ३,५०,००० पेक्षा जास्त झाली आहे. गेल्या २४ तासांत ९२ संक्रमित लोकांच्या झालेल्या मृत्यूमुळे येथील मृतांचा आकडा हा ३,६३३ वर पोहोचला आहे. रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रशियातील कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण … Read more

कोरोना तर केवळ हिमनगाचे टोक, जगाला यापेक्षाही भयानक रोगांना सामोरे जावे लागेल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील वटवाघळावर संशोधन करणाऱ्या ‘बॅट वुमन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शी झेंगली यांनी तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनीला नुकत्याच काही मुलाखती दिल्या आहेत त्यांनी कोरोना विषाणू हा तर हिमनगाचे केवळ एक टोक आहे. असे असंख्य विषाणू असण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये आपले थैमान घालत असलेला कोरोना हा एकमेव विषाणू नाही … Read more

WHO ची चेतावणी; ज्या देशात कमी झाले संक्रमण तिथे पुन्हा वाढणार कोरोना रुग्णांची संख्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी म्हटले आहे की,’ ज्या देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाण कमी होत आहे, तेथे या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना न केल्यास, कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉक्टर माईक रायन यांनी आपल्या ऑनलाइन ब्रीफिंगमध्ये सांगितले की,’ संपूर्ण जग हे अजूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव … Read more

गुड न्यूज! अमेरिकेच्या ‘या’ कंपनीने कोरोनावरील औषधाचा माणसावरील प्रयोग केला सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीने ऑस्ट्रेलियामध्ये मानवांवर कोरोनाव्हायरसच्या औषधाची चाचणी सुरू केल्याची घोषणा केली आहे. या वर्षाच्या अखेरीस हे औषध तयार होईल, असे कंपनीने म्हटले आहे. ‘नोव्हावॅक्स’ या बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे लीड रिसर्चर डॉ. ग्रिगोरी ग्लेन यांच्या म्हणण्यानुसार मेलबर्न आणि ब्रिस्बेन शहरातील सुमारे १३१ जणांवर या औषधाची चाचणी सुरू झाली आहे. ग्लेन यांनी … Read more

देशात कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट वाढला; 41 टक्क्याहून अधिक रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांत नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून सोमवारी पहाटेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या एक लाख 38 हजारांवर पोहोचली आहे. परंतु, या सर्वांमध्ये देशातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे, ही एक दिलासाची बातमी आहे. आतापर्यंत देशात सुमारे चाळीस टक्क्यांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर … Read more

कर्तव्यावर असणार्‍या कोरोना योध्दा डाॅक्टरचा कोरोना अहवाल पोझीटीव्ह

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्हा रुग्णालय येथे कर्तव्यावर असणार्‍या कोरोना योध्दा डाॅक्टरांचा कोरोना अहवाल सकारात्मक आलेला आहे. मात्र संबंधीत डाॅ. हे मागील १५ दीवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयातच कर्तव्यावर होते. संबंधीत कोरोना योध्दा डाॅ. हे अचलपुर तालूक्यातील असल्याची माहीती असून मात्र हे डाॅ. मागील १५ दीवसांपेक्षा जास्त काळापासून त्यांच्या गावी आलेच नासल्याची माहीती ऊपवीभागीय … Read more

लॉकडाऊनमुळे जीव वाचले नाहीत तर जीव गेले, नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचे खळबळजनक विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात पसरलेला कोरोना विषाणू सर्वांमध्ये भीती निर्माण करत आहे. इटलीमधील त्याचे तांडव बघून हळूहळू अनेक देशांनी संचारबंदी लागू केली. आतापर्यंत जगभरात ५५,०३,४५९ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी ३, ४६, ७७४ मृत्यू झाले आहेत. तर २३,०३,६३१ रुग्ण बरे झाले आहेत. जगात अनेक ठिकाणी अजून संचारबंदी आहे. तर काही ठिकाणी हळूहळू नियम शिथिल केले जात … Read more