१ महिना व्हेंटीलेटरवर राहूनही ५ महिन्यांच्या एका मुलीची कोरोनावर मात जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलमध्ये एका महिन्यापासून व्हेंटिलेटरवर असूनही एका ५ महिन्यांच्या बाळाने कोरोनाव्हायरसवर मात केली. डॉक्टर हा एक चमत्कारच मानत आहेत. येथे काही महिन्यांपूर्वी ५ महिन्यांची एक मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीएनएनच्या वृत्तानुसार, ही मुलगी गेल्या एका महिन्यापासून कोमामध्ये होती असे असूनही ती वाचली गेली. या … Read more

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

या १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होते आहे. काही राज्यांमध्ये संख्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढतेच आहे. आसाममध्ये देखील गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आहे. देशातील एकूण १३ शहरामध्ये ७०% कोरोनाबाधित रुग्ण … Read more

रुग्णांच्या देखभालीसाठी पुढे न येणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्सवर आता मेस्मा अंतर्गत कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या २ महिन्यांपासून सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात राज्यभरातील डॉक्टर आणि नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचारी वर्ग हे अग्रभागी राहून काम करत आहेत. यामध्येच खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी सुरक्षेच्या कारणावरून काम करण्यास मनाई केली होती.  पुण्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनाही मेस्मा … Read more

राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे सुतोवाच

पुणे । लॉकडाऊनमुळं राज्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे औंध ते काळेवाडी साईचौक येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्धाटन आज अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे गेले दोन ते अडीच … Read more

Lockdown 4.0 | १२ दिवसांत ७० हजार नवीन कोरोनाग्रस्त; १ हजार ६७७ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या ग्राफने आज सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आतापर्यंत, एकाच दिवसात कधीही ७००० पेक्षा जास्त प्रकरणे दाखल झालेले नाहीत, मात्र गेल्या २४ तासांत ७,४६६ नवीन प्रकरणे नोंदली गेल्यानंतर चिंता अधिकच वाढली आहे. असे नाही की, कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे फक्त आजच खूप वाढली आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही कोरोनाच्या … Read more

कोरोनावर मात करण्यासाठी पतंजलीही मैदानात; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव यांचे पतंजली उत्पादन भारतभरात प्रसिद्ध आहे. विविध आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांचे अनेक उपाय प्रसिद्ध आहेत. ते सतत विविध कार्यक्रमातून, शिबिरातून योगमहत्व सांगत असतात. कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरु असताना रामदेव बाबा हे विविध वाहिन्यांवर लोकांना संचारबंदीचा सदुपयोग करीत योगाभ्यास करा, नियमित योग करा असा संदेश देताना दिसत आहेत. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम … Read more

खूषखबर! आता २०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी, तासाभरात अहवाल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्चपासून काही प्रमाणात आलेल्या कोरोना संक्रमणाने आता वेग धरला आहे. गेले अनेक दिवस सतत रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाची चाचणी करणे सामान्य माणसाच्या खिशाला परवडण्यासारखे नाही आहे. खाजगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यासाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. पण आता एक नवी पद्धत संशोधित केली आहे. त्यामुळे लवकरच चाचणीचे मूल्य कमी होणार आहे. … Read more

रशियामध्ये कोरोना विषाणूची सुमारे ९००० नवीन प्रकरणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सुमारे ९००० नवीन घटना समोर आल्या आहेत. यामुळे इथे संक्रमित लोकांची संख्या ३,५०,००० पेक्षा जास्त झाली आहे. गेल्या २४ तासांत ९२ संक्रमित लोकांच्या झालेल्या मृत्यूमुळे येथील मृतांचा आकडा हा ३,६३३ वर पोहोचला आहे. रशियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रशियातील कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण … Read more

कोरोना तर केवळ हिमनगाचे टोक, जगाला यापेक्षाही भयानक रोगांना सामोरे जावे लागेल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधील वटवाघळावर संशोधन करणाऱ्या ‘बॅट वुमन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शी झेंगली यांनी तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनीला नुकत्याच काही मुलाखती दिल्या आहेत त्यांनी कोरोना विषाणू हा तर हिमनगाचे केवळ एक टोक आहे. असे असंख्य विषाणू असण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये आपले थैमान घालत असलेला कोरोना हा एकमेव विषाणू नाही … Read more