खूषखबर! आता २०० रुपयात होणार कोरोनाची चाचणी, तासाभरात अहवाल 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्चपासून काही प्रमाणात आलेल्या कोरोना संक्रमणाने आता वेग धरला आहे. गेले अनेक दिवस सतत रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनाची चाचणी करणे सामान्य माणसाच्या खिशाला परवडण्यासारखे नाही आहे. खाजगी प्रयोगशाळेत चाचणी करण्यासाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. पण आता एक नवी पद्धत संशोधित केली आहे. त्यामुळे लवकरच चाचणीचे मूल्य कमी होणार आहे. केवळ २०० रुपयात आता कोरोनाची चाचणी करता येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ने के किट विकसित केले आहे. यामध्ये रिलायन्स ने मदत केली आहे.

कोरोनाचे निदान करणाऱ्या आरटी-लॅम्प कोविड-१९ टेस्ट किटविषयी (Reverse Transcriptase- loop Mediated Isothermal Amplification) परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे यांनी माहिती दिली आहे.  “कोविड-१९ आरटी-लॅम्प चाचणी न्युक्लिक असिड आधारित आहे. रुग्णांच्या घशातील अथवा नाकातील स्वॅबचा नमुना घेऊन ही चाचणी केली जाते. कृत्रिम टेम्प्लेटचा वापर करून ही चाचणी विकसित करण्यात आली आहे आणि तिचं प्रात्यक्षिकही यशस्वीरित्या झालं आहे,” अशी माहिती मांडे यांनी दिली आहे. आता सामान्य माणसालाही आपल्या खिशाला परवडेल अशी कोरोनाची चाचणी करता येणार आहे.

“आरटी-लॅम्प टेस्ट ही खूप स्वस्त आहे.  टेस्टसाठी लागणारे साहित्यही बिनखर्चाचे आहे. आणि ती कमी वेळातही करता येणार आहे. सध्या चाचणीचे अहवाल येण्यास बराच उशीर लागतो आहे. लोकांचे अहवाल पेंडिंग राहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना परवडू शकेल आणि वेळही वाचवेल अशा या चाचणीने दिलासा मिळणार आहे. या चाचणीसाठी सीएसआयआर ने रिलायन्ससोबत करारही केला आहे.  जम्मूतील इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसीन आणि रिलायन्स उद्योग एकत्र येऊन कोरोनाचे  निदान करणारी एक नवीन आरटी-लॅम्प किट विकसित करणार आहे अशी माहिती दिली होती. या नवीन टेस्टिंग किटमुळे चाचणीसाठी शंभर ते दोनशे खर्च येईल. त्याचबरोबर एका तासातच करोना चाचणीचा अहवाल आपल्याला मिळू शकेल. अशी माहिती देण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment