कोरोनावर मात करण्यासाठी पतंजलीही मैदानात; उचलले ‘हे’ मोठे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । योगगुरू बाबा रामदेव यांचे पतंजली उत्पादन भारतभरात प्रसिद्ध आहे. विविध आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांचे अनेक उपाय प्रसिद्ध आहेत. ते सतत विविध कार्यक्रमातून, शिबिरातून योगमहत्व सांगत असतात. कोरोनाचे सर्वत्र थैमान सुरु असताना रामदेव बाबा हे विविध वाहिन्यांवर लोकांना संचारबंदीचा सदुपयोग करीत योगाभ्यास करा, नियमित योग करा असा संदेश देताना दिसत आहेत. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम ठेवण्यासाठी घरच्या घरी आपण काय करू शकतो, कोणता आहार घेऊ शकतो अशा प्रकारची माहिती ते या काळात देत आहेत. तसेच ते यावर उपचारही करत होते. आता पतंजली मार्फत प्रत्यक्ष मैदानात उतरून अर्थात वैद्यकीय चाचण्या करत या युद्धात सहभाग नोंदवला गेला आहे.

कोरोनाचे संकट अधिक प्रमाणात पसरते आहे. अशावेळी पतंजली ने नियामक मंडळाच्या मान्यतेने वैद्यकीय चाचण्या सुरु केल्या आहेत. “आम्ही केवळ रोगप्रतिकारक शक्तीबद्दल बोलत नाही आहोत, तर आम्ही कोरोनाच्या उपचारांबद्दल सांगत आहोत. गेल्या महिन्यात नियामक मंडळाची मान्यता घेऊन पतंजली कंपनीने इंदूर आणि जयपूर येथे कोरोनाच्या वैद्यकीय चाचण्या सुरु केल्या आहेत.” अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी दिली आहे. गिलियड सायंसेज, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, इनोव्हियो फार्मा आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाईन या कंपन्यांसोबत पतंजलींचेही नाव आता कोरोनाच्या उपचारांमध्ये जोडले जाणार आहे. ही नक्कीच कंपनीसाठी फायद्याची आणि महत्वाची बाब असणार आहे.

फेब्रुवारी महिन्यापासूनच पतंजली ने कोरोना रुग्णांवर उपचार सुरु केले होते. साधारण मार्चपर्यंत त्यांनी अनेकांवर उपचार केला. पण अद्याप ते चाचणीचा भाग नव्हते. त्यामुळे संशोधनाला उपचारांचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी चाचणीची मान्यता नियामक मंडळाकडून मिळणे आवश्यक होते. पण मान्यता मिळणे इतके सोपे नव्हते. आयसीएमआर ने हे संशोधन पुढे नेण्यास काही रस दाखवला नाही. म्हणून पतंजली समूहाने क्लिनिकल ट्रायल्स रेग्युलर ऑफ इंडियाकडे याची नोंद करून जयपूर विद्यापीठांतर्गत एका विभागात चाचण्या सुरु केल्या आहेत. तसेच आमच्या प्रयोगशाळा उत्तम असल्याचा दावा बाळकृष्ण यांनी केला आहे. तर त्यांच्याकडे ५०० संशोधक आणि १०० पोस्ट डॉक्टरेट संशोधक आहेत अशी माहिती दिली आहे. २०१९ च्या माहितीनुसार या कंपनीचा टर्नओव्हर ८ हजार ५०० कोटी इतका आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment