शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

चिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य रेषेखाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे पंतप्रधान ली किंग यांनी गुरुवारी सांगितले की,’ त्यांच्या देशात ६० दशलक्षाहून अधिक गरीब लोक असून त्यांचे मासिक उत्पन्न हे फक्त एक हजार युआन म्हणजेच सुमारे १४० डॉलर्स इतके आहे आहे. ते म्हणाले की,’ कोरोना विषाणूच्या साथीने या लोकांची अवस्था अधिकच खराब झाली आहे. वार्षिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना ली म्हणाले, … Read more

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला मुंबईहून … Read more

या १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होते आहे. काही राज्यांमध्ये संख्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये रुग्ण संख्या वाढतेच आहे. आसाममध्ये देखील गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संख्या वाढते आहे. देशातील एकूण १३ शहरामध्ये ७०% कोरोनाबाधित रुग्ण … Read more

फायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच? फैसला उद्या..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयीन परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. केवळ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार होत्या. तशी माहितीही देण्यात आली होती. पण कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता या परीक्षा रद्द कराव्यात असा विचार सुरु आहे. अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मेच्या दरम्यान होणार होत्या. … Read more

शाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज? घ्या जाणून..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटकाळात शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने बैठका घेतल्या होत्या त्याचप्रमाणे या आपत्कालीन परिस्थितीत शैक्षणिक सत्राबाबत शासनाने राज्य शिक्षक परिषदेकडे काही सूचना मागितल्या होत्या. त्यानुसार परिषदेने नियोजन प्रारूप आराखडा सादर केला आहे. अशी माहिती या परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे व उपाध्यक्ष मोहन ओमासे यांनी दिली आहे. हे प्रारूप तयार करण्यासाठी … Read more

रुग्णांच्या देखभालीसाठी पुढे न येणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्सवर आता मेस्मा अंतर्गत कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। गेल्या २ महिन्यांपासून सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात राज्यभरातील डॉक्टर आणि नर्स तसेच रुग्णालयातील कर्मचारी वर्ग हे अग्रभागी राहून काम करत आहेत. यामध्येच खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी सुरक्षेच्या कारणावरून काम करण्यास मनाई केली होती.  पुण्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सनाही मेस्मा … Read more

सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झटका; जून मध्ये पेट्रोल ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता पेट्रोल पंपावर प्रतिलिटर ४ ते ५ रूपयांपेक्षा जास्त रुपये देण्यास तयार रहा. पुढील महिन्यापासून सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज रिवाइज करण्यासाठी तयारी करीत आहेत. गेल्या आठवड्यात किरकोळ इंधनाबाबत सरकारी तेल कंपन्यांनी बैठक घेतली होती. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाऊनसाठी रोडमॅप तयार करण्यात आला … Read more

राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे सुतोवाच

पुणे । लॉकडाऊनमुळं राज्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ही माहिती दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे औंध ते काळेवाडी साईचौक येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्धाटन आज अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे गेले दोन ते अडीच … Read more

दूरदर्शनवर भरणार शाळा? राज्य सरकारने केंद्राकडे मागितली वेळ

नवी दिल्ली । राज्यातील कोरोना संकट अद्याप स्थिर आहे. त्यामुळे दरवर्षी १५ जूनला सुरु होणाऱ्या शाळा यावर्षी संचारबंदीनंतर कधी सुरु करायच्या यावर शासन विचार करत होते. राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी काही दिवसापूर्वी यासंदर्भात एक आढावा बैठकही घेतली होती. या बैठकीत राज्यातील शाळा १५ जूनला सुरु होण्याची कोणतीच शक्यता वर्तविण्यात आली नव्हती. मात्र एका मुलाखतीत मुख्यमंत्री यांनी … Read more