बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीची पुन्हा सरावास सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला बऱ्याच दिवसानंतर फुटबॉलचा सराव करताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंददायक भावना होती. शुक्रवारी स्पॅनिश लीगमधील इतर काही खेळाडूंसह त्याने खासगी सराव सत्रात भाग घेतला. कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे स्पेनमधील लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू जवळजवळ दोन महिने ग्राउंडवर उतरू शकलेले नाहीत. खेळाडूंचा सराव सुरू होणे म्हणजे देशांतर्गत … Read more

सोन्या चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लॉकडाऊन असूनही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने मोठा बदल होत आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर बुधवारीच्या तुलनेत ३५७ रुपयांनी वाढून ४६२२१ रुपये झाले. जर आपण २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे तर शुक्रवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याच्या ९१६ ची किंमत ४२३३८ रुपये होती.बुधवारी पूर्णिमाच्या दिवसामुळे बाजार काल बंद झाला होता. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदीचा … Read more

कोरोनाचं संकट गंभीर पण सरकार खंबीर आहे हे विसरु नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करत राज्यातील जनतेला कोरोनाच्या संकटात राज्य सरकार काय करत आहेत याची माहिती देत राज्यातील जनतेला आश्वस्त केले. अफवांबाबत खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या बाबतीत पसरत असलेल्या अफवांबाबत खुलासा केला. ते … Read more

देशभरात २४ तासात कोरोनाचे ३ हजार ३९० नवे रुग्ण आढळले, रुग्णसंख्या ५६ हजार पार

नवी दिल्ली । कोरोना प्रादुर्भावा संदर्भातील मागील २४ तासाची आकडेवारी आज पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. या आकडेवारीनुसार मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ३ हजार ३९० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसोबत देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही ५६ हजार ३४२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासातच १ हजार ३७३ रुग्ण कोरोना … Read more

पालकांना दिलासा; शाळांना ‘फी’ वाढ न करण्याचे राज्य शासनाचे आदेश

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं आर्थिक संकट निर्माण झालेले आहेत. अशा वेळी राज्य शासनाने पालकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची … Read more

येत्या १० दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली । देशभरातील सार्वजनिक वाहतुक सुरु करण्याबाबत एक महत्वाचा निर्णय केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. येत्या १० दिवसात देशभरातील सार्वजनिक वाहतूक सुरु होणार असल्याचं गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन लागू झाल्यापासून सार्वजनिक प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, बंद असलेली … Read more

लॉकडाऊन ३१ मेपर्यंत लांबणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई । राज्यातील कोप्रादुर्भाव वाढतच असून तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच तसे संकेत दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज रात्री ८ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार असल्याने ते काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

कामगारांना घरी जाण्यासाठी आता मेडिकल सर्टिफिकेटची गरज नाही; सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई । राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन आणि बसेसचीही व्यवस्था केली जात आहे. मात्र प्रवासासाठी संबंधित व्यक्तीकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असणे गरजेचं होतं. त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी घरी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांची डॉक्टरांकडे रांग लागली होती. अनेक ठिकाणी या गरजू मजूर, कामगारांची लूटही होत होती. हीच बाब लक्षात … Read more

लॉकडाउनमध्ये कंडोमचा खप खरंच वाढला का? जाणून घ्या खरं काय ते..

वृत्तसंस्था । जगभरात लॉकडाउनमुळे नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांवर चर्चा सुरू असताना दुसरीकडे कंडोमच्या विक्रीत वाढ होत असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर जोरात सुरू होती. कंडोम विक्रीत वाढ झाल्याचा हा दावा खरा आहे का? याचा आढावा घेताना समोर आलेली माहिती नक्कीच या प्रश्नाचं खरं उत्तर देणारी आहे. जवळपास दिड  महिन्यांआधी जगभरात कोरोना लॉकडाउनची सुरुवात करण्यात आली. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतरच्या … Read more

‘या’ गोष्टींवर मंत्र्यांनी दर्शवली तीव्र नाराजी; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

मुंबई । आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासन बऱ्याच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासनाविरोधात तक्रार केली. ज्या पद्धतीने प्रशासनातील अधिकारीवर्ग परस्पर निर्णय घेत आहे आणि राबवताना घोळ घालत आहे, याबाबत मंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनात नसलेले समनव्य, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडून परस्पर निघत असलेले आदेश आणि निर्णय … Read more