दुर्दैवी! यूपीत महिला पोलीस कर्मचारी कोरोनाने दगावली, ४ दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म

लखनऊ । देशामध्ये कोरोना विषाणूच्या फैलाव झपाट्याने  होत आहे. कोरोनासोबतच्या लढाईत सर्व प्रशासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यात सर्वात आघाडीवर असणाऱ्यांपैकी पोलीस कोरोनाला रोखण्यासाठी रस्त्यावर पहारा देत आहेत. मात्र, या जीवघेण्या कोरोनानाने या पोलीसांवर सुद्धा झडप घातली आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या तैनात … Read more

गुड न्यूज! राज्यात २ दिवसांत ७०० कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत जवळपास ७०० पेक्षा अधिक रुग्ण कोरोना आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० … Read more

लॉकडाऊनमुळे साई बाबा मंदिर संस्थानच्या दानपेटीतही खडखडाट

अहमदनगर । कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशात आणि राज्यात अनेक निर्बंध घातले गेले. कोरोनाचा विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून लोकांसाठी सार्वजनिक ठिकाण बंद करण्यात आली. त्यात प्रामुख्यानं प्रार्थनास्थळांचा समावेश होता. लॉकडाऊनमुळं ही प्रार्थनास्थळ बंद असल्यानं भाविकांकडून या ठिकाणांना दिली जाणारी दान-दक्षिणा एकदम बंद झाली. देशातील सर्वाधिक दान मिळणारं मंदिर संस्थानांपैकी एक म्हणजे शिर्डी साई बाबा … Read more

रेल्वेचा ‘तो’ दावा खोटा!- अनिल देशमुख

मुंबई । लॉकडाऊनमुळे शहरात स्थलांतरित मजूर, कामगारांना स्वगृही परतण्यासाठी केंद्र सरकारनं रेल्वेमार्फत विशेष श्रमिक ट्रेन सुरु केल्या. परंतु लॉकडाऊनमुळे आधीच हातच काम जाऊन आर्थिक संकटात सापडलेल्या मजुराकडून प्रवास खर्च आकारण्यावरून केंद्रावर जोरदार टीका झाली. अशात रेल्वे मंत्रालयानं स्थलांतरित कामगार व मजुरांच्या परतीच्या प्रवास खर्चावर रेल्वे खातं ८५ टक्के सूट असल्याचे स्पष्ट केलं. मजुरांना प्रवास खर्चावर … Read more

कोरोनाच्या लढाईत योगदान द्या, अन्यथा..; राज्य सरकारची खासगी डॉक्टरांना नोटीस

मुंबई । राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावमुळे सरकारी आरोग्य विभागावर ताण वाढला आहे.सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांना एक नोटीस बजावली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी तत्त्वांवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सेवाभावाने पुढे येत आपलं योगदान द्यावं असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सर्वच खासगी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत रुजु व्हावं असं … Read more

कहर कोरोनाचा; देशभरात २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू; 2 हजार 958 नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. गंभीर बाब म्हणजे देशात कोरोनाबाधितांची आकडा 50 हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. देशातील सतत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 49 हजार 391 वर पोहचली आहे. आतापर्यंत देशाभरात 1 हजार 694 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 14 हजार 183 लोक … Read more

खुशखबर! मुंबई, पुण्यात अडकून असलेल्यांची शासन करणार एसटीनं मोफत घरी पाठवणी

मुंबई । कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. राज्यात अंतर्गत प्रवासावर निर्बंध घालत जिल्हा बंदी करण्यात आली. अशा परिस्थितीत मुंबई, पुण्यासारख्या शहरात नोकरी, कामधंदा, शिक्षणासाठी आलेले महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिक अडकून पडले. दरम्यान आता मुंबई, पुण्यासारख्या विविध शहरांमध्ये अडकून असणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. शासनाकडून … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी दवाखान्यात आता प्रायव्हेट डाॅक्टरांना ड्यूटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी डॉक्टरांबाबत महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने असे म्हटले आहे की आता खासगी डॉक्टरही सरकारी रुग्णालयात बसतील. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक (मुंबई) म्हणाले की आम्ही आता खासगी डॉक्टरांना कोरोना विषाणूच्या रुग्णांवर १५ दिवस उपचार करण्यास सांगितले आहे. We’ve asked all private doctors, who are … Read more

… म्हणूनच पाकिस्तानी सरकार हळूहळू लॉकडाऊन शिथिल करेल-इम्रान खान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनवचे काटेकोरपणे पालन करून घेण्यास सक्षम नसल्याबद्दल तज्ज्ञांच्या टीकेला सामोरे जाणारे पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊनमध्ये हळूहळू सूट देण्याचे संकेत दिले आहेत. सरकारने आगामी काळात हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याचे इम्रानने म्हटले आहे. ते म्हणाले की हे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि विशेषत: कोरोना विषाणूच्या या साथीच्या परिस्थितीला लक्षात घेऊन हा … Read more

कोरोना संदर्भात रशियन सरकारवर टीका करणारे तीन डॉक्टर पडले रहस्यमय अपघातांना बळी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये अचानक कोरोना विषाणूची प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांची अवस्था आणखी बिकट झालेली आहे.इथे रूग्णांची तपासणी करण्यासाठीही वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत. यानिमित्ताने डॉक्टर सतत सरकारवर टीका करीत असून या टीकेच्या बदल्यात त्यांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन आठवड्यांत रशियातील ३ डॉक्टर हे रुग्णालयाच्या खिडकीतून खाली पडले आहेत, त्यातील … Read more