देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७८ हजार पार

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. एव्हाना देशव्यापी लॉकडाऊनला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. तरी कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 78 हजार 3 झाली आहे. त्यापैकी 49 हजार 219 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर … Read more

मागील २४ तासांत देशभरात ४२१३ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक संख्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची संख्या 67 हजारांच्या पुढे पोहचली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 4 हजार 213 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आतापर्यंतचा एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 67 हजार 152 झाली आहे. गेल्या 24 … Read more

दिलासादायक! देशात २०,९१७ रुग्ण करोनामधून बरे

नवी दिल्ली । भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताच आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येनं आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. मात्र, देशभरातील आरोग्य यंत्रणांच्याच प्रयत्नानं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे. देशभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३१.१५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण देशभरात २० हजार ९१७ रुग्ण … Read more

चिंता वाढत आहे! देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ६० हजारांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचत आहे. सुरुवातीला धीम्या गतीनं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता झपाट्यानं वाढू लागला आहे. अर्थात देशाच्या काही भागांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे हे नाकारता येणार नाही. असं असलं, तरीही रुग्णांचा वाढता आकडा हा देशाचा वाढता धोका अधोरेखित करत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने … Read more

देशभरात २४ तासात कोरोनाचे ३ हजार ३९० नवे रुग्ण आढळले, रुग्णसंख्या ५६ हजार पार

नवी दिल्ली । कोरोना प्रादुर्भावा संदर्भातील मागील २४ तासाची आकडेवारी आज पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आली. या आकडेवारीनुसार मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ३ हजार ३९० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसोबत देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही ५६ हजार ३४२ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासातच १ हजार ३७३ रुग्ण कोरोना … Read more

कोरोनाचा थेट मंत्रालयावर हल्ला; एका प्रधान सचिवाला कोरोनाची बाधा

मुंबई । मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. अशा गंभीर स्थितीत सरकारतर्फे मोठ्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. मात्र जिथून या उपाययोजनांची सूत्र हलवली जातात त्या मंत्रालयात आता कोरोनानाने शिरकाव केला आहे. मंत्रालयात एका विभागाच्या प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे परराज्यातील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन … Read more

दुर्दैवी! यूपीत महिला पोलीस कर्मचारी कोरोनाने दगावली, ४ दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म

लखनऊ । देशामध्ये कोरोना विषाणूच्या फैलाव झपाट्याने  होत आहे. कोरोनासोबतच्या लढाईत सर्व प्रशासकीय यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यात सर्वात आघाडीवर असणाऱ्यांपैकी पोलीस कोरोनाला रोखण्यासाठी रस्त्यावर पहारा देत आहेत. मात्र, या जीवघेण्या कोरोनानाने या पोलीसांवर सुद्धा झडप घातली आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. आपले कर्तव्य बजावणाऱ्या तैनात … Read more

गुड न्यूज! राज्यात २ दिवसांत ७०० कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत जवळपास ७०० पेक्षा अधिक रुग्ण कोरोना आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० … Read more

महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होत चालली आहे. करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. राज्यातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक आयोजित करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्रात १५,५२५ … Read more

मुख्यमंत्री ठाकरेंनी रेल्वे, लष्कर व पोर्ट ट्रस्टला दिली मदतीची साद; केली ‘ही’ मागणी

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्यांबरोबरच रुग्णांची संख्याही वाढत असल्यानं राज्य सरकारनं उपचाराच्या सुविधा वाढवण्यासाठी कंबर कसली आहे.  त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध संस्थांकडं आयसीयू बेड्ससाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत म्हणून रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्थांनी … Read more