चिंता आणखी वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ३५ हजार पार..

नवी दिल्ली । दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरलेत. मात्र, आतापर्यंतच्या लॉकडाउनच्या कालावधीत देशभरात कोरोनावर अजूनही अपॆक्षित असं नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडतच आहे. ताज्या आकडेवारीनुसार आजपर्यंत देशातील करोनाबाधितांची संख्या ३५ हजार ०४३ वर पोहचली आहे. तर यातील ८ हजार ८८९ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरले … Read more

२४ तासात कोरोनाने ६७ जणांचा मृत्यू; रुग्णांची संख्या ३४ हजारांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाने चांगलाच मुक्काम टाकला आहे. दररोज नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असून मृत्यूही नोंदवले जात आहेत. मागील २४ तासांच्या आकडेवारीनुसार देशभरात १ हजार ८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ हजार ७५वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या २४ तासात … Read more

अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६० हजार पार!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस संकटाशी सामना या दिवसात भारतासह संपूर्ण जग करीत आहे.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारतात कोरोना पॉझिटिव्हची रुग्णांची संख्या ही ३३ हजारांच्या पुढे गेली आहे.तसेच त्यामुळे आतापर्यंत १०७४ लोक मरण पावले आहेत. त्याच वेळी, जगभरात कोरोनाव्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ३२ लाखांवर गेली आहे.तसेच २ लाख २८ हजारांहून अधिक लोकांचा … Read more

ट्रम्प यांचा जागतिक आरोग्य संघटनेवर पुन्हा हल्ला म्हणाले,”डब्ल्यूएचओ म्हणजे चीनच्या हातातले खेळणे”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) चीनचे हातचा बाहुला म्हटले आणि सांगितले की अमेरिका लवकरच डब्ल्यूएचओबद्दल काही शिफारसी घेऊन येईल आणि त्यानंतर चीनबाबतही असेच पाऊल उचलले जाईल. ट्रम्प यांनी कोरोना विषाणू या साथीच्या आजाराविषयी बोलले. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील आपल्या ओव्हल कार्यालयात पत्रकारांना सांगितले की, “आम्ही लवकरच एक … Read more

देशात २४ तासात कोरोनामुळे ७१ जणांचा मृत्यू, रुग्णसंख्या ३२ हजारांच्याजवळ

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसताना कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा चिंतेत भर पडत आहे. गेल्या २४ तासाचा आढावा घेतल्यास कोरोनाचे १८१३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे भारतातील करोनाबाधितांची संख्या ३१ हजार ७८७ इतकी झाली आहे. कोरोनामुळे २४ तासात ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन १००८ रुग्णांचा मृत्यू झाला … Read more

तारांबळ! औरंगाबाद पोलीसांनी पकडलेला आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद । पोलीस कोठडीत असलेल्या एका 42 वर्षीय आरोपीचा स्वाब नमुन्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यातील सुमारे 30 ते 35 पोलीस अधिकारी-कर्मचारी या कोरोनाबधित आरोपीच्या संपर्कात आले होते. त्या सर्वांची कोविड१९ चाचणीनंतर त्यांना क्वांरन्टीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे. प्रतिबंधित … Read more

चिंताजनक! देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ हजार ३३२ तर मृत्यूंनी गाठला हजाराचा टप्पा

नवी दिल्ली । लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्यापही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. भारतात गेल्या २४ तासात ७३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली आहे. सोबतच १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. … Read more

देशात एकाच दिवसात ५१ जणांचा कोरोनाने मृत्यू, रुग्ण संख्या ३० हजारांजवळ

नवी दिल्ली । देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ५९४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले रुग्ण आहेत. या नव्या रुग्णाची भर पडल्यानंतर देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ … Read more

जाणून घ्या राज्यातील जिल्हा व मनपानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी; एका क्लीकवर..

मुंबई । महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण रोज कमी अधिक असले तरी साथीवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. राज्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा आज साडेआठ हजारपार गेला आहे.राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ८हजार ५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण … Read more

आकडा वाढतोय! देशातील करोनाग्रस्तांची संख्या ३०,००० जवळ

नवी दिल्ली । दिवसेंदिवस कोरोनाचा विषाणू अनेकांनावर हल्ला करताना दिसत आहे. देशातील कोरोनग्रस्तांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी आणखी भर पडली. देशात आणखी ९३४ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. त्यामुळे हा आकडा ३०,००० काठावर पोहोचला आहे. सध्या देशात २९४३५ करोनाग्रस्त आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. देशभरात २४ … Read more