कोरोना व्हायरस वरील वॅक्सिनबाबत जगाला भारताकडून आशा! ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगभरात २ लाखाहून अधिक लोकांचा जीव गेलेला आहे तसेच सुमारे ३ दशलक्ष लोकांना या विषाणूची लागण झालेली आहे. जगातील सर्व देश या विषाणूपासून मुक्त होण्यासाठी लसी किंवा औषधे तयार करण्यात गुंतले आहेत परंतु असे असूनही कोणालाही अजून यामध्ये यश आलेले नाही आहे. अशा परिस्थितीत आता कोविड -१९ लससाठी जग … Read more

१६ मेनंतर भारतात ‘कोव्हिड १९’चा रुग्ण आढळणार नाही, नीती आयोगाच्या सदस्याचा दावा

वृत्तसंस्था । सद्यस्थितीत भारतातील ‘कोव्हिड १९’च्या रुग्णांमध्ये रोज लक्षणीय वाढ होत असली, तरी १६ मेनंतर देशात एकही करोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी एका अभ्यासाद्वारे मांडले आहे. कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी देशभरात लॉकडाउन लागू केल्यानं कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग मंदावला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे … Read more

१ मिनिट श्वास रोखता येत असेल तर तुम्हाला कोरोना नाही; रामदेव बाबांचा दावा

नवी दिल्ली । सध्या देशात कोरोनानाने थैमान घातलं आहे. सगळीकडे चिंतेच वातावरण आहे. अशा वेळी कोरोना संबधी अजब दावे सध्या ऐकायला मिळत आहेत. असाच एक दावा योगगुरु म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा रामदेव यांनी शनिवारी केला आहे. “कुठलीही व्यक्ती एक मिनिटासाठी श्वास रोखून धरत असले तर याचा अर्थ त्या व्यक्तीला करोना व्हायरसची बाधा झालेली नाही.” असा … Read more

देशात आजपासून ‘ही’ दुकानं राहणार सुरु, ‘ही’ दुकान राहणार बंदच

नवी दिल्ली । करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेत शनिवारपासून देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी दिली होती. परंतु कोणती दुकानं उघडी ठेवावीत, कोणती नाही याबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर … Read more

महाराष्ट्र नाही तर देशातील ‘या’ राज्यात सर्वात वेगाने पसरतोय कोरोना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २३ हजाराहून अधिक लोकांना या धोकादायक विषाणूची लागण झालेली आहे. दरम्यान, देशभरात चालू असलेल्या या लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत आयआयटी दिल्लीने डेटाच्या आधारे एक अहवाल तयार केला आहे. यानुसार, कोरोनाचे दोन तृतीयांश रुग्ण हे देशभरातील या … Read more

दिलासादायक! देशातील कोरोना रुग्ण वाढ दरात मोठी घसरण

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णावाढीच्या दरात मोठी घसरण झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात महिन्याभरापूर्वी लॉकडाउन जाहीर केला, त्यावेळी देशभरात करोना रुग्णांची संख्या केवळ ५०० इतकी होती. मात्र, ही संख्या पुढे वाढत जाईल यांचे संकेत तेव्हाच मिळत होते. त्यानुसार, २४ मार्च या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची दिवसाला सरासरी वाढ २१.६ टक्के इतकी नोंदवण्यात आली … Read more

चीनने पाठवलेल्या ‘बोगस’ रॅपिड टेस्ट किट भारत परत करणार- केंद्रीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली । चीनकडून आयात करण्यात आलेल्या ‘रॅपिड टेस्टिंग किट’ चुकीचा निकाल देत असल्यानं अशा बोगस किट चीनला परत पाठवण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला. आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या साहाय्यानं सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांशी राज्यांच्या संवाद साधला. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन … Read more

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजारा पार; गेल्या २४ तासात १६८४ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली । देशभरात गेल्या २४ तासात १६८४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार ७७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील २८ दिवसात देशातल्या १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ८० जिल्हे … Read more

राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची मान्यता- राजेश टोपे

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करत असून राज्याकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात असलेली मागणी आता केंद्र सरकारने मान्य केली आहे. राज्यात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आज … Read more

धक्कादायक! एका महिन्यात मुंबईतील रुग्णसंख्या शंभर पटीने वाढली

मुंबई । संपूर्ण देशाला कोरोनाने जखडून ठेवलं आहे. दिवसागणिक कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत जाऊन अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोना प्रसारच मोठं केंद्र बनलेल्या मुंबापुरी म्हणजेच मुंबईत कोरोनाने हैदोस घातलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबईत संपूर्ण देशाच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आहेत. एवढंच नव्हे … Read more