Thursday, March 30, 2023

२४ तासात कोरोनाने ६७ जणांचा मृत्यू; रुग्णांची संख्या ३४ हजारांच्या टप्प्यावर

- Advertisement -

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाने चांगलाच मुक्काम टाकला आहे. दररोज नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असून मृत्यूही नोंदवले जात आहेत. मागील २४ तासांच्या आकडेवारीनुसार देशभरात १ हजार ८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १ हजार ७५वर जाऊन पोहोचला आहे. गेल्या २४ तासात नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नोंदींनंतर देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे.

दरम्यान, आतापर्यंत वाढलेल्या ३३ हजार ६१० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८ हजार २७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. येत्या ३ मेला लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपणार असून कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही नाही. तूर्तास भारतात रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे.

- Advertisement -

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”