‘बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  कोरोना नियमावली वरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांच्या बाहेर जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली आहे, हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे, यातून शिवसेनेची मानसिकता काय आहे याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची घणाघाती … Read more

मार्चपासून 50 वर्षांवरील नागरिकांना कोविडची लस मिळणार – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

Dr.harshwardhan

नवी दिल्ली | पुढील महिन्यापासून म्हणजे मार्च 2021 पासून पन्नास वर्षावरील नागरिकांना कोविडची लस देण्याची योजना केंद्र शासन आखत आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. तसेच, केंद्र शासन त्यावर प्रायोरिटीने काम करत आहे. अशी सूचनाही त्यांनी दिली. भारताने देशामधेच करोनाची लस बनवली. आणि गेल्या काही दिवसांपासून ती देण्यासही सुरुवात केली. सुरुवातीचा टप्पा सद्ध्या … Read more

Economic Survey 2021: अर्थव्यवस्थेच्या रिकव्हरीसाठी ठोस पावले उचलली जाणार, यासाठी केंद्र सरकारची काय योजना आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM nirmala sitharaman) यांनी शुक्रवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2020-21 (Economic Survey 2021) सादर केले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आर्थिक विकास दर (GDP) 11 टक्के राहण्याचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक … Read more

कोरोना लसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून सावध रहा! कॉल आल्यावर शेअर करू नका आधार-OTP नंबर

नवी दिल्ली | कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांना लस दिली जात आहे. यानंतर ही लस ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने फसवणूक करणार्‍यांना कोविड -19 लसीकरणाच्या (Covid-19 Vaccination) नावाखाली सतर्क राहण्यास सांगितले आहे. पीआयबीने ट्वीट केले आहे की, “काही फसवणूक … Read more

नवसंजीवनी!! हनुमानाचं छायाचित्र ट्विट करत ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी मानले भारताचे आभार; म्हणाले की,…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताने कोरोना लसींना परवानगी दिल्यानंतर ब्राझीलनं मदतीसाठी हात पुढे केला होता. भारताने ही ब्राझीलला त्यांच्या प्रतिकूल काळात मदत करत कोव्हिशील्डच्या 20 लाख डोसने भरलेल्या दोन विमानं मुंबई विमानतळावरून ब्राझील आणि मोरोक्कोला रवाना झाली. देशाच्या या मोलाच्या योगदानामुळे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैयर बोल्सनारो यांनी भारताचं कौतूक केलं आहे कोरोना प्रतिबंधात्मक लसींची खेप ब्राझीलला … Read more

ठरलं तर !! पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार कोरोना लस ; केंद्राचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून देशात 16 जानेवारी रोजी लसीकरण सुरू झालं आहे. यावेळी कोरोना काळात दिवस रात्र जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली. पहिल्या टप्प्यात सुमारे 7 लाख आरोग्य सेवकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Sensex ने ओलांडली विक्रमी पातळी, 1000 अंकांवरून 50000 अंकांपर्यंतचा ‘हा’ प्रवास कसा आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । बीएसईचा प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्सने आज बाजारात विक्रम नोंदवला. आज सेन्सेक्सने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सन 2020 मध्ये काही तज्ञांचा असा विश्वास होता की, 2021 च्या अखेरीस सेन्सेक्स 50 हजारांच्या पुढे जाईल, परंतु वर्षाच्या सुरूवातीसच सेन्सेक्सने हा आकडा गाठला आहे. सेसेन्क्सने 6 वर्षात 8 महिने 5 दिवसांत 25 हजार ते 50 … Read more

WHO म्हणाले- गरीब देशांना लस देणे आवश्यक आहे, नॉर्वेनेही दिला ‘हा’ इशारा

लंडन । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे प्रमुख, टेड्रॉस एडॅनॉम घेबेरियसस (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले आहेत की, कोरोनाव्हायरस व्हॅक्सीनचे (Coronavirus Vaccine) आगमन आणि ती मिळविण्यासाठीची स्पर्धा सुरु आहे परंतु या मध्ये जगातील गरीब देशा मागे पडण्याची भीती आहे. डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी असा इशारा दिला आहे की, गरीब देशांमध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू न केल्यास उर्वरित जग कोरोना … Read more

चांगली बातमी! आज पुन्हा स्वस्त झाले सोने, आपल्या शहरात दहा ग्रॅमचा दर काय आहे ते जाणून घ्या

Gold Rates Today

नवी दिल्ली । सोमवारी सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज फ्युचर ट्रेडमध्ये सोन्याचा भाव 40 रुपयांनी घसरून 48,685.00 रुपयांवर होता. त्याचबरोबर चांदीच्या तुलनेत तीव्र वाढ दिसून आली आहे. मार्चचा फ्युचर ट्रेडिंग 260.00 रुपयांनी वाढून 65,024.00 रुपयांवर आला. देशाच्या राजधानीत सोन्या-चांदीचा नवीनतम दर काय आहे ते पाहूयात- सोने – दिल्लीमध्ये 18 … Read more

‘या’ कारणांमुळे कोरोना लसीकरणाला राज्यात 2 दिवस स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेला 16 जानेवारी सुरुवात झाली. मात्र, आता या मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने कोरोना लसीकरणाची मोहिम बंद झाली आहे. हा दोष दुरुस्त करण्यासाठी 17 आणि 18 जानेवारी असे 2 दिवस हे लसीकरण बंद राहणार आहे. केंद्र सरकारकडून ही समस्या दूर करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू … Read more