कोरोना लसीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीपासून सावध रहा! कॉल आल्यावर शेअर करू नका आधार-OTP नंबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कामगारांना लस दिली जात आहे. यानंतर ही लस ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने फसवणूक करणार्‍यांना कोविड -19 लसीकरणाच्या (Covid-19 Vaccination) नावाखाली सतर्क राहण्यास सांगितले आहे.

पीआयबीने ट्वीट केले आहे की, “काही फसवणूक करणारी लोकं स्वतःला भारतीय ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे अधिकारी असल्याचा दावा करून, ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्याच्या नावाखाली कॉल करीत आहेत आणि त्यांना आधार कार्ड, ओटीपी सारखी माहिती विचारत आहेत.” ही फसवणूक आहे आणि हे गुन्हेगारांचे कृत्य आहे. अशा कोणत्याही कॉलवर आपले आधार कार्ड आणि ओटीपी माहिती कोणाबरोबरही शेअर करू नका.

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम
कोविड -19 विरुद्ध लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. आतापर्यंत कोविड -19 ची ही लस सुमारे 15 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना देण्यात आली आहे. गेल्या शनिवारपर्यंत 15,37,190 लोकांना ही लस देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना ही लस कधी दिली जाईल हे केंद्र सरकारने अद्यापही सांगितले नाही. आता लोकं Co-WIN वर लससाठी स्वत: चे रजिस्ट्रेशन करू शकतात. Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला डीएल, पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट सारख्या कागदपत्रांची आवश्यकता असेल.

गेल्या 24 तासांत कोरोनाच्या संसर्गाच्या 14,849 नवीन केस दाखल झाल्या
विशेष म्हणजे, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाची 14,849 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची एकूण प्रकरणे 1 कोटी 6 लाखांपेक्षा जास्त झाली आहेत. नमुन्यांच्या चाचणीबद्दल बोलतांना आतापर्यंत देशात 19 कोटी 17 लाखाहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment