WHO म्हणाले- गरीब देशांना लस देणे आवश्यक आहे, नॉर्वेनेही दिला ‘हा’ इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे प्रमुख, टेड्रॉस एडॅनॉम घेबेरियसस (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले आहेत की, कोरोनाव्हायरस व्हॅक्सीनचे (Coronavirus Vaccine) आगमन आणि ती मिळविण्यासाठीची स्पर्धा सुरु आहे परंतु या मध्ये जगातील गरीब देशा मागे पडण्याची भीती आहे. डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी असा इशारा दिला आहे की, गरीब देशांमध्ये लसीकरण कार्यक्रम सुरू न केल्यास उर्वरित जग कोरोना संक्रमणापासून सुरक्षित राहणार नाही. दुसरीकडे, नॉर्वेने असा इशारा दिला आहे की, कोरोना विषाणूपासून पूर्णपणे बचावासाठी लोकांना दोन नव्हे तर तीन वेळा लस द्यावी लागेल. या वर्षाच्या अखेरीस देशातील लोकांना आणखी एक लस घ्यावी लागेल, असे नॉर्वेने म्हटले आहे.

सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात, सोमर म्हणाले की,” एकीकडे कोरोना लस आमच्यासाठी आशा निर्माण करीत आहे, तर दुसरीकडे यामुळे उद्भवणारा खरा धोकाही समोर येत आहे. श्रीमंत देश आणि जगातील गरीब देश यांच्यात असंतोषाची भिंत आहे, जी त्याच्या वितरणात मोठा अडथळा ठरू शकते.” ते म्हणाले, “हे चांगले आहे की, सरकारांनी त्यांच्या आरोग्य सेवकांना आणि वृद्धांना प्रथम लस द्यायाचा निर्णय घेतला आहे. परंतु श्रीमंत देशातील तरूण आणि निरोगी प्रौढ लोकांना गरीब देशांमधील आरोग्यसेवक आणि वृद्ध लोकांआधी लस मिळणे हे योग्य ठरणार नाही.” ते म्हणाले की, सध्या 49 श्रीमंत देशांमध्ये 3.9 कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आलेले आहेत, तर गरीब देशांमध्ये त्यातील फक्त 25 लोकांनाच लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.” ते म्हणाले की,” या आकडेवारीवरून असेच दिसते की, जग भयंकर नैतिक अपयशाच्या मार्गावर आहे आणि जगातील सर्वात गरीब देशांतील लोकांना त्याची किंमत मोजावी लागेल.”

मोठया देशांनी जबाबदारी घ्यावी
टेड्रॉस म्हणाले की,”लसीच्या वितरणामध्ये समानता आणणे केवळ देशांची नैतिक जबाबदारीच नाही तर ती मोक्याच्या आणि आर्थिक पातळीवरही महत्त्वपूर्ण ठरेल.” ते म्हणाले की,” ही लस मिळवण्याच्या स्पर्धेमुळे जगातील गरीबांना धोका निर्माण होईल आणि यामुळे साथीचा रोग पूर्णपणे नष्ट होणार नाही. वर्षाच्या पहिल्या शंभर दिवसांत जगातील सर्व आरोग्य कर्मचारी आणि वृद्ध लोकांना कोरोना लस देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी सर्व देशांना केले.” ते म्हणाले की,” गेल्या अनेक महिन्यांपासून ही संघटना सर्व देशांमध्ये समान प्रमाणात लस देण्यासाठी संघर्ष करीत आहे. संस्थेने पाच उत्पादकांकडून लसीचे 2 अब्ज डोस मिळवले आहेत आणि लसीचे आणखी एक अब्ज डोस मिळण्याची शक्यता आहे.” ही संस्था फेब्रुवारीमध्ये लोकांना लस देण्यास सुरूवात करेल.

नॉर्वेनेही दिला इशारा
नॉर्वेच्या नॅशनल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थने असा इशारा दिला आहे की,’ ज्या लोकांना कोरोना विषाणूचे दोन डोस दिले गेले आहेत त्यांना वर्षाच्या अखेरीस आणखी एक डोस घ्यावा लागेल.’ ते म्हणाले, ‘कदाचित असे असेल की, काही महिन्यांनंतर आपल्याला बूस्टर लस द्यावी लागेल परंतु आपल्याला अजून त्याब्ब्दल माहिती नाही. ही परिस्थिती आहे ज्यासाठी आपण तयार आहोत. गरज भासल्यास लस उत्पादक देखील यासाठी तयार आहेत. संस्थेचे संचालक गीर बुखोलम म्हणाले की,” आपणास असा विश्वास आहे की, काही काळ तुमच्यात प्रतिकारशक्ती आली आहे. या लसांविषयी अनेक गोष्टी आहेत ज्याची माहिती नाही. आता लोकांना ही लस मिळत असल्याने आपल्याला या प्रकारची माहिती घ्यावी लागेल.

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या ताज्या संशोधनानुसार या लसी केवळ 5 महिन्यासाठी प्रतिकारशक्ती देत ​​आहेत. यापूर्वी, लस उत्पादक कंपनी मॉडर्नाने दावा केला आहे की, त्यांची लस ही वर्षभर प्रभावी राहील, परंतु संशोधकांचे असे म्हणणे आहे की, ही लस 100% गॅरेंटीने मिळालेली नाही. काही लोकांना लस दिल्यानंतर काही प्रमाणात रोग प्रतिकारशक्ती मिळते, परंतु ते इतरांना संक्रमितही करु शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment