राज्यात कडक लॉकडाऊन होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून जनतेसाठी चिंतेची बाब आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली असली आणि ठिकठिकाणी निर्बंध लादण्यात आले असले तरी कोरोना काही आटोक्यात येईना. त्यामुळे राज्य सरकार आता कडक लॉकडाउन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या … Read more

राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन अपरिहार्य- विजय वडेट्टीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाचं संकट वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन  होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहे. लशींचा तुटवडा निर्माण होऊनही महाराष्ट्राला पुरवठा केला जात नाही. … Read more

कोरोनाबाबत वक्तव्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी दिले भिडे यांच्यावर कारवाईचे संकेत

ajitdada bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकीकडे देशात कोरोनाने हाहाकार माजावलेला असताना शिवाप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत असे धक्कादायक विधान केलं होते. आता याच विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. भिडे यांनी यापूर्वी बागेतल्या आंब्या बाबत विधान केले होते. आता केलेले विधान म्हणजे विनाशकाले विपरीत … Read more

कोरोनाचा आलेख वाढताच..!देशात एका दिवसात आढळले 1.31 लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण

corona

नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी देखील एक लाखांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. मागील 24 तासात देशात 1लाख 31 हजार 968 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ही संख्या आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ही 1 कोटी 30 लाख … Read more

देशात 11 ते 14 एप्रिलपर्यंत लसीकरण उत्सव ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना लसीच्या नादात चाचण्या करण्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यानेच कोरोना वाढला अस मत मोदींनी व्यक्त केले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आपल्याला कोरोना व्हायरससोबत कोरोना लसीशिवाय … Read more

चिंताजनक! मागील 24 तासात देशात 685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

aurangabad corona

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब ठरत आहे. मागील 24 तासात देशात 1 लाख 26 हजार 789 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या फोफावणाऱ्या कोरोनाला रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. तसेच कोरोनामुळे मागील 24 तासात देशात 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे .कोरोनाची … Read more

18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार; जो बायडन यांची मोठी घोषणा

Joe Biden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. १९ एप्रिलपासून सर्व सज्ञान व्यक्तींना कोरोना लस देण्याचे बायडन यांनी जाहीर केले आहे. अमेरिकेतही कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. तसेच लसीकरणावरही … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

modi covid vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मोदी यांनी ट्विटर वर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना … Read more

राज्यातील कडक निर्बंधामध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ‘हे’ आहे स्पष्टीकरण

मुंबई | महाराष्ट्र रूग्ण संख्येचा वाढीचा वेग हा चिंताजनक आहे. वाढता करोना यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या कडक निर्बंधांच्या विरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी व्यापार्‍यांकडून विरोध व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने लागू केलेल्या निर्बंध यामध्ये काही शिथिलता येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री … Read more

धुळे जिल्ह्यात सर्व मालवाहतूक सेवा सुरू राहणार; जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आश्वस्थ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड मोठया प्रमाणावर शिरकाव झाला आहे. अनेक गावात लोकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अशातच जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश काढले असल्याची बातमी प्रसारित झाली. ही संचारबंदी म्हणजे थेट वाहतूक व्यवस्था सुद्धा बंद केल्याचा आदेश पास झाला असण्याची चुकीची माहिती लोकांपर्यंत पोचवली गेल्यामुळे त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती … Read more