भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; 72 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या ओमिक्रोन आणि कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. या नव्या कोरोनाच्या ओमिक्रॉनने अनेकांना जखडले आहे. दरम्यान भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी गेला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. याबाबात अधिक माहिती अशी की, संबंधित मृत्यू पावलेली व्यक्ती ७२ वर्षीय रुग्ण असून ती ओमिक्रॉन पॉझिटिव्ह निघाली … Read more

शहरातील शाळा पुन्हा ‘लॉकडाऊन’ ! 

औरंगाबाद – कोरोना व ओम्रीकॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील दहावी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू असतील. तर दहावीच्या पुरवणी परीक्षा देखील नियोजित वेळापत्रकानुसार पार पडतील. आगामी 31 जानेवारीपर्यंत हे आदेश देण्यात … Read more

मिनी लॉकडाऊनबाबत टास्क फोर्सने घेतला ‘हा’ निर्णय; व्यापारी, नोकरदारांसाठी महत्वाची बातमी

मुंबई । राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा मिनी लॉकडाऊन लागू करण्याच्या चर्चा केल्या जात होत्या. याबाबत टास्क फोर्सचे तज्ज्ञ यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत बैठक झाली. सदर बैठकीत महत्वाची चर्चा करण्यात आली आहे. राज्यात तुर्तास मिनी लॉकडाऊन न लावता त्या ऐवजी निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी … Read more

दुप्पट वाढ : सातारा जिल्ह्यात 189 पाॅझिटीव्ह, तर रेट 7. 45 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 189 जण बाधित आढळले आहेत. तर दोनजण ओमायक्रोन बाधित आढळले आहेत. आतापर्यंत जिह्यात एकूण 8 ओमायक्रोन बाधितांची संख्या झालेली आहे. कोरोना बाधितांचा आकडा हा कालपेक्षा दुप्पट झाला आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 534 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली … Read more

परिस्थितीचा अंदाज घेऊन शहरातील शाळांबाबत निर्णय

औरंगाबाद – मुंबईत दररोज 8 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने तेथील मनपा प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात मंगळवारी 87 कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आम्ही परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत. लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊ अशी माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग … Read more

शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही बंद होणार?; उदय सामंत म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोना विषाणू संसर्गात वाढ होत असल्यामुळे मुंबईतील शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे कि नाही याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली. “आजच्या बैठकीत कोविड 19 बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी … Read more

एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 10 मंत्र्यांना आणि 20 हून जास्त आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान आता राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे, असे … Read more

कोरोना बाधित शतकाकडे : सातारा जिल्ह्याचा पाॅझिटीव्ह रेट 3. 45 टक्के

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 98 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा गेल्या काही दिवसातील आकडा आता वाढू लागल्याने लागला आहे. गेल्या दोन महिन्यांतील उच्चांकी कोरोना बाधित आढळल्याने जिल्हा प्रशासनापुढे पुन्हा कोरोना थोपवण्याचे आव्हान उभे राहताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात 98 लोक बाधित आढळून आले … Read more

जिल्हा नियोजनासाठी 500 कोटी मागणार

collector

औरंगाबाद – कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून विकासकामांना फारसा निधी मिळालेला नाही. त्यामुळे बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी वाढीव निधीची मागणी केली. त्यामुळे राज्याकडे जिल्हा नियोजनासाठी 500 कोटी रुपयांची मागणी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. यावेळी प्रारंभी जिल्हाधिकारी … Read more

पहिल्या दिवशी जिल्ह्यात 6 हजार मुले लसवंत

औरंगाबाद – केंद्र सरकारने काल पासून 15 ते 18 वर्षाच्या तरुणांना कोरणा प्रतिबंधक लस देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबादेतही कालपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तब्बल 6 हजार 194 मुलांचे लसीकरण करण्यात आले. या योजनेचा प्रारंभ पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गारखेडा येथील प्रियदर्शनी विद्यालयात करण्यात आला. यावेळी आमदार अंबादास … Read more