कर्वे समाज संस्थेतर्फे मजुरांसाठी समुपदेशन

लेबर रिलीफ कॅम्पमध्ये लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कामगार व मजुरांना मानसिक आधार देण्यासाठी मानसिक समुपदेशन कार्यक्रम सुरु करण्यात आला असून याचा लाभ सुमारे तीन हजार मजुरांना होणार असल्याची माहिती कर्वे समाज सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

३९ हजार रुग्ण असताना दारूची दुकाने उघडली ! याला म्हणतात खतरों के खिलाडी…

मुंबई |५५० करोनाग्रस्त रुग्ण होते, तेव्हा लॉकडाऊन केल. आणि आता ३९ हजार रुग्ण आहेत, तेव्हा दारुची दुकानं सुरु करण्यात आली आहेत. यालाच म्हणतात खतरों के खिलाडी अस ट्विट करत अभिनेता एजाज खान याने सरकारचा समाचार घेतला आहे. सध्या करोनाग्रस्त रुग्णांनी थैमान घातलं आहे. त्यात आता लोक दारुसाठी दुकानासमोर गर्दी करत आहेत. ही गर्दी करणे देखील … Read more

यंदाची पंढरीची आषाढी ‘वारी’ चुकणार?

पुणे  । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लोकांच्या सार्वजनिक सण-समारंभ, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले. लॉकडाउनच्या काळात गुढीपाडवा, रमजान सारखे सण घरात बसून साजरे करण्याची वेळ आली. कोरोनाच्या संसर्गावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. अशातच लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला. मात्र अजूनही पुढे काय होणार यावर अनिश्चितता आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या पंढपूरच्या विठुरायाची आषाढी … Read more

रोहित पवारांनी गर्दी करणाऱ्या तळीरामांना दिला हा मोलाचा ‘सल्ला’

मुंबई । केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांची गर्दी दिसून आली. गेल्या दीड महिन्यापासून दारूविना तडफडत असलेल्या तळीरामांनी लांब रांगेत उभे राहून अधाशी वृत्तीने आपला दारूचा कोटा ‘फुल’ करायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी तर या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोल्हापूरमध्ये तर दारू मिळवण्यावरून दोन … Read more

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कोठडीतील आरोपीला कोरोनाची लागण

पुणे । पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढला असून कोरोनाने आता पोलीस कोठडीतील आरोपीपर्यंत मजल मारली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ही माहिती समोर येताच या आरोपीच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होत अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. … Read more

जपानमध्ये आणीबाणीचा कालावधी ‘मे’च्या अखेरपर्यंत वाढविण्यात आला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांनी सोमवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लागू झालेल्या आणीबाणीची मुदत मे अखेरपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबद्दल तज्ज्ञांच्या मूल्यांकनाचा संदर्भ देताना अ‍ॅबे म्हणाले की, कोरोना विषाणूची लागण होणाच्या संख्येत लक्षणीय घट झालेली नाहीये आणि रूग्णालयात अजूनही क्षमतेपेक्षा जास्त रूग्ण आहेत म्हणून सद्यस्तिथीत ही आणीबाणी सुरु राहिली पाहिजे.ते … Read more

रशियामध्ये कोरोनाचा हाहाकार;गेल्या २४ तासांत १०,००० पेक्षा जास्त नवीन संसर्गाची नोंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी रशियामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची १०,००० पेक्षा जास्त नवीन प्रकरणे नोंदली गेली.यासह,या देशात प्रथमच कोविड -१९ रूग्णांच्या संख्येत एका दिवसात पाच अंकी वाढ झाली आहे.येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की १०,६३३ नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणे हि मॉस्कोमधून समोर आलेली आहेत.यामुळे मॉस्कोची वैद्यकीय सुविधा बिघडण्याच्या शक्यतेत वाढ झाली आहे.उल्लेखनीय हे आहे की … Read more

राज्यात ३१ मेपर्यंत ग्रीन झोनची संख्या वाढलीच पाहिजे; मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचना

मुंबई । राज्याचे अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे नेता येईल हे पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा … Read more

नवीन भानगड! आफ्रिकी स्वाइन फ्लूने आसाममध्ये २,५०० डुकरांचा मृत्यू

गुवाहाटी । संपूर्ण देशाला कोरोनाच्या विषाणूने विळखा घातला आहे. देश ठप्प आहे. नागरिक भीतीच्या वातावरणात घरात कोंडून आहेत. लॉकडाउन आणि अर्थचक्रही मंदावलं हे सर्व एका विषाणूमुळे घडत आहे. दरम्यान आता एक नवीन संकट उभं ठाकलं आहे. भारतात आता आफ्रिकी स्वाइन फ्लू दाखल झाला आहे. .या आजारामुळे आसाममधील ३०६ गावातील २ हजार ५००हून अधिक डुकरांचा मृत्यू … Read more

दिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली । देशात करोना फैलाव अद्यापही थांबलेला नाही. देश लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. अशा चिंताजनक वातावरणात एक एक दिलासा देणारी बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात आतापर्यंत ११ हजार ७०६ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले असून, गेल्या २४ तासांत १०७४ लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जवळपास २७.५ टक्के लोकांनी करोनावर … Read more