लॉकडाउन हटवण्याची घाई, महागात पडेल- WHO

वृत्तसंथा । सध्या संपूर्ण देशाला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला. गेली १८ दिवस लोक घरात बसून आहेत, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार, रस्ते वाहतूक बंद आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत लॉकडाऊनच्या भवितव्याबाबत चर्चा होत असताना … Read more

वाढीव संचारबंदी आवश्यकच, हा लढा आता माणूस जगवण्यासाठी आहे – सचिन पायलट

आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे. कोणत्याही पक्ष आणि विचारधारेच्या पलीकडचे हे आव्हान आहे. आपण एक राष्ट्र आहोत. त्यामुळे या संकटाचा सामना आपण माणूस म्हणूनच केला पाहिजे. तुम्ही काय क्षमतेत योगदान देऊ शकता? याचा काही फरक पडत नाही. पण योगदान देऊ शकणाऱ्या प्रत्येकाने ते दिले पाहिजे. अर्थात मदत आणि संवादाचा हा दुतर्फा रस्ता असला पाहिजे.

महिलांवरील घरगुती हिंसाचाराला ‘लॉकडाऊन’ नाहीच, संचारबंदीत महिलांच्या त्रासाचे प्रमाण वाढले

संसाधने असेही सांगतात की हिंसा करणे म्हणजे पुरुषासाठी मर्दपणाचे लक्षण असल्याची ठाम कल्पना असते. सध्याचे भीतीचे, अनिश्चिततेचे, बेरोजगारीचे, अन्नाच्या असुरक्षिततेचे वातावरण पुरुषांच्या अपुरेपणाची भावना निर्माण करू शकते. हे सर्व घटकांमुळे घरात तणाव वाढण्याची आणि या तणावाच्या बळी महिला पडण्याची शक्यता आहे.

कोरोनाव्हायरससाठी शास्त्रज्ञांनी सहा संभाव्य औषधे शोधली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शास्त्रज्ञांनी दहा हजाराहून अधिक संयुगांमधून अशी सहा औषधे शोधली आहेत जी कोरोना विषाणूचा उपचार करण्यास मदत करू शकतात. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार क्लिनिकल ट्रायल्स आणि इतर संयुगांमध्ये या ओळखल्या जाणार्‍या औषधांच्या प्रभावांचे परीक्षण केले जाते. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ल्यूक गुड्डाट म्हणाले, “सध्या कोरोना विषाणूचा कोणताही वैद्यकीय सराव किंवा उपचारांचा … Read more

पाकिस्तानमध्ये कोरोनाचे रुग्ण ४६०१ पर्यंत वाढले आणि मृतांचा आकडा ६६ वर पोचला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची संख्या झपाट्याने वाढून ४६०१ झाली आहे तर ६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात संसर्गाची २८० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी पहाटे राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर सांगितले की गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात म्हटले आहे की कोविड -१९च्या कारणामुळे मृत्यू झालेल्यांची … Read more

राज्यातील मोठ्या बाजार समित्या बंद झाल्यानं शेतकरी संकटात

 पुणे । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. बाजार समित्या बंद करताना कोणतीही पर्यायीव्यवस्था उभी न करता सरकारच्या या निर्णयामुळे शेजारी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्या बंद झाल्यानं फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे साथीच्या … Read more

मुंबईत एकाच दिवसात आढळले २१८ करोना रुग्ण,कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराच्या उंबरठ्यावर

मुंबई । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असून राजधानी मुंबई करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले असून १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने … Read more

Don’t Worry! भारताकडे ३ कोटी २८ लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्स

नवी दिल्ली । भारताकडे कोरोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्सचा पुष्कळ साठा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. भारताकडे सध्या तब्बल ३ कोटी २८ लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्स आहेत. तर भारताची सध्याची गरज १ कोटी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्सची आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत … Read more

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ICUमधून आले बाहेर

वृत्तसंस्था । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होत. दरम्यान, त्यांना आता अतिदक्षता विभागाबाहेर आणण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अशी माहिती रुग्णालयानं दिली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांना आयसीयूमधून बाहेर आले असले तरी त्यांना रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली आहे. ब्रिटनमध्ये सुद्धा … Read more

पंजाबमध्ये १ मे पर्यंत लॉकडाउन; महाराष्ट्रात कधी?

वृत्तसंस्था । देशभरात सध्या एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लॉकडाउन लांबणार कि संपणार? करोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर विचार सुरू असतानाच ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पंजाबमध्ये सुद्धा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पंजाब १ मे … Read more