दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चालक ठार तर दुसरा जखमी

सातारा | वाई-जांभळी रस्त्यावर धोम गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. तानाजी नवलू शेलार (वय- 32, रा. खावली, ता. वाई) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, वाईच्या पश्चिम भागातील रेणावळे या गावी … Read more

येरळा नदीत पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वृध्दाचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव नजीक असलेल्या येरळा नदीच्या पात्रात एक वृध्द चरायला नेलेली जनावरे घेवून घरी परतताना पूराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. भिकू आकोबा पाटोळे (वय- 60) असे सदरील इसमाचे नाव असून आज सोमवारी दि. 12 रोजी ते मयत अवस्थेत आढळून आले आहेत. याबाबतची पुसेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी … Read more

रामोशीवाडी नजीक महेंद्रा पिकअप व स्कार्पिओची समोरासमोर धडक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुसेगाव ते कोरेगाव दरम्यान रामोशीवाडी (ता. कोरेगाव) नजीक डॉक्टर भुतकर यांचे आरोग्य ऊर्जालया समोर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महिंद्रा पिकअप आणि स्कार्पिओ समोरासमोर धडकली. वडापच्या काळी पिवळी महिंद्रा पिकअपमध्ये 7 प्रवाशी होते. या अपघातात तीनजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान दहिवडीकडून … Read more

सातारा- पुणे मार्गावर इको कार बुलेटवर आदळली : 5 जण गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- पुणे महामार्गावर चारचाकी इको कारचा टायर फुटल्याने समोर चालणाऱ्या बुलेटवर आदळली. यामध्ये कार पलटी होऊन डिवाडरला धडकल्याने त्यामधील दोन महिलासह चालक आणी बुलेटस्वार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहितीच भुईंज पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी ,की जिता (ता. पेण. जि. रायगड) येथील रहिवासी … Read more

दाजीने मेव्हुण्याला भोकसले : उंडाळेत रेठऱ्याच्या दूध व्यावसायिकाचा खून

कराड | तालुक्यातील उंडाळे गावातील माळी वस्ती येथे घरगुती कारणातून दाजीने मेव्हुण्याचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. अनंत चतुर्थीला रात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनास्थळावरून फरार आरोपीला कराड तालुका पोलिसांनी अवघ्या अडीच तासात ताब्यात घेतले आहे. सचिन वसंत मंडले (वय- 35, मूळ रा. रेठरे खुर्द, सध्या- उंडाळे, ता. कराड) … Read more

लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या उंब्रजच्या युवकास सक्तमजुरी

Karad Court

कराड | लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या उंब्रज येथील युवकास वीस वर्षे सक्त मजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश के. एस. होरे यांनी सुनावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ही … Read more

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर साताऱ्यातील जागीच 2 ठार : भीषण अपघातात 15 जखमी

वाई | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील कोंडावळे (ता. वाई) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 15 जण गंभीर जखमी आहेत. अपघातात लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (वय -24) व गणेश बाळू कोंढाळकर (वय -22) रा. कोंढावळे, ता. वाई, जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर चोरट्यांनी जिलेटीनने बँक ऑफ महाराष्ट्रचे ATM उडविले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बंगलोर महामार्गावरील नागठाणे येथे रस्त्याकडेला असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम जिलेटीनच्या कांड्याचा स्फोट करून उडवून दिले आहे. या स्फोटानंतर चोरट्यांनी लाखों रूपयांची रक्कम चोरण्यात चोरटे यशस्वी झाल्याची अद्याप माहिती समोर येत असून अद्याप अधिकृत किती रक्कम चोरीस गेली आहे, हे समोर आलेले नाही. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही … Read more

तलावात बुडालेला युवकाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील अवसरी येथे जनावरे धुण्यासाठी घेऊन गेलेला बावीस वर्षीय युवक बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. दत्ता रघुनाथ शिर्के (रा.अवसरी, या. पाटण) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. तीन दिवसानंतर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील अवसरी येथील दत्ता शिर्के हा युवक नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी … Read more

महामार्गावर विना हेल्मेट 40 दुचाकी चालकांवर कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावरील विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 40 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाहन चालकांची चांगलीच पळापळ उडाली. विना हेल्मेट वाहन चालकांवर यापुढेही कारवाई करणार असल्याचे वाहतूक शाखेच्या सरोजिनी पाटील यांनी सांगितले. कराड तालुक्यातील खोडशी येथे … Read more