दहा दिवसापूर्वी कोविड-19 मुळे मृत्यू झालेली आजी परत आली घरी; सर्वांना आश्चर्याचा धक्का

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | मृत्यू पावलेल्या व्यक्ती परत जिवंत होऊ शकते का? असे कुणाला विचारल्यास वेगवेगळी उत्तरे येतील. पण पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास फक्त ‘नाही’ हेच उत्तर मिळेल. पण स्पेनमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. दहा दिवसापूर्वी कोविडमुळे मृत्यू पावलेली आज्जी परत तिच्या घरी स्वतः चालत आली आहे. त्यामुळे सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. … Read more

दक्षिण आफ्रिका: कोरोनाचा फायदा घेत आहेत हिंदू पुजारी, अंत्यसंस्कारांसाठी मागितले जात आहेत जास्त पैसे

जोहान्सबर्ग । दक्षिण आफ्रिकेत काही हिंदू पुजाऱ्यांवर कोविड -१९ मुळे मरण पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त शुल्क मागितल्याचा आरोप केला गेला आहे. डर्बन येथील क्लेअर इस्टेट स्मशानभूमीचे व्यवस्थापक प्रदीप रामलाल यांनी असे करणाऱ्या पुजार्‍यांचा निषेध केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील हिंदु धर्म असोसिएशनचे सदस्य रामलाल म्हणाले की कोविड -१९ मुळे अनेक कुटुंबातील नातेवाईक मरण पावले आहेत. अशा अनेक … Read more

996 वर्क कल्चरमुळे नाराज झाले चिनी कामगार, कमी पगार आणि कामाच्या दबावामुळे करताहेत आत्महत्या …!

नवी दिल्ली । चीन या शेजारील देशात 996 वर्क कल्चरने (996 Work Culture) आपले पाय रोवले आहेत. चिनी टेक कंपन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या कल्चरविरूद्ध चिनी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जास्त कामाचा दबाव, कमी पगार आणि त्यांच्याशी भेदभाव यामुळे टेक कंपन्या, विशेषत: ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. चीनमधील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी तणाव बनलेला … Read more

औरंगाबादेत 27 वर्षीय तरुणाची भोसकून हत्या; पोलिस‍ांकडून 12 तासात संशियितांना बेड्या

औरंगाबाद प्रतिनिधी |  किरकोळ वादानंतर तीन आरोपीनी 27 वर्षीय तरुणाला भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास औरंगपुरा भागातील पिया मार्केट जवळ घडली. सीसीटीव्ही च्या मदतीने रात्री उशिरा सिटीचौक पोलिसांनी तीन संशयित आरोपिना अटक केली. समीर खान सिकंदर खान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समीर हा औरंगपुरा भाजी मंडई जवळील … Read more

US Capitol Violence: हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू, मृतांची संख्या झाली पाच

वॉशिंग्टन । कॅपिटल बिल्डिंगमध्ये (यूएस संसद भवन) बुधवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आता हिंसाचारातील मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. बुधवारी आंदोलकांशी झालेल्या चकमकीत अमेरिकेचे कॅपिटल पोलिस (Police) अधिकारी ब्रायन डी. सिक्निक जखमी झाले. यानंतर सिक्निक आपल्या ऑफिसमध्ये परतला जिथे ते बेशुद्ध पडले. अमेरिकन कॅपिटल पोलिस (USCP) यांनी गुरुवारी रात्री उशिरा … Read more

सातार्‍याचा जवान सुजित किर्दत चीनच्या सीमेवर शहीद; वडील सैन्यातून सुभेदार पदावरुन सेवानिवृत्त

Sujit Kirdat

सातारा प्रतिनिधी | सिक्कीम येथे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना इंजिनिअरिंग रेजिमेंटमधील हवालदार सुजित नवनाथ किर्दत (वय ३७, मूळ रा.चिंचणेर निंब ता. सातारा) हे जवान हुतात्मा झाले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने या घटनेला दुजोरा दिला आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र दुर्घटनेचा तपशील समजू शकला नाही. जवान किर्दत यांच्या पश्चात पत्नी, … Read more

काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यात 5 ठार, 21 जखमी

काबूल । शनिवारी एकापाठोपाठ जोरात स्फोटांनी अफगाणिस्तानातील काबूल (Kabul) हादरले, एएफपीच्या पत्रकारांनी रॉकेटसारखे स्फोट ऐकले. या घटनेत 5 मृत्यू आणि 21 जखमींची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राजधानीतील दाट लोकवस्तीच्या भागात हा स्फोट झाला ज्यामध्ये केंद्रामध्ये असलेल्या ग्रीन झोनही सामील आहे. गृह मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक आर्यन म्हणाले, “आज सकाळी हल्लेखोरांनी काबूल शहरावर 14 रॉकेट डागले. … Read more

लॉकडाऊनमुळे धंद्याला फटका बसल्याने कराड तालुक्यातील व्यावसायिकांची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लॉकडाऊनमधील काळात व्यवसायला मोठा फटका बसल्याने वसंतगड येथील व्यावसायिकाने राहत्या घराजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मारूती एकनाथ चव्हाण (वय- 55, सध्या रा. वसंतगड, मूळ रा. पश्‍चिम सुपने, ता. कराड) असे आत्महत्या केलेल्याचे नांव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पश्‍चिम सुपने येथील मारूती चव्हाण … Read more

दुर्दैवी घटना ! बुडणाऱ्या भाच्यांना वाचवताना मामाचाही बुडून मृत्यू

Drawned

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे वाण नदीच्या पात्रातील पाणीच्या डोहामध्ये बुडणाऱ्या भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा हि बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडली आहे. यात दोन सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सोनपेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे. सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील एक महिला दसरा सणानिमित्त कपडे धुण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी … Read more

नदीत बुडून दोन बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | गावातील महिलांसह नदीवर अंघोळीला गेलेल्या दोन तरुण बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील खामगाव येथे घडली.या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरती कैलास कवडे वय-22 वर्षे, ऋतुजा शिवाजी कवडे वय-18 वर्षे अशी पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या दुर्दैवी … Read more