राज्यात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांचा संप; फडणवीसांनी ऊर्जा विभागाला दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Employees strike Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगीकरणाला विरोध करत आजपासून पुढील तीन दिवस महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपाचा चांगलाच फटका बसू लागला असून राज्यात काही ठिकाणी वीज पुरवठा हा बंद झाला आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला असल्याने … Read more

मी साडी नेसते… तर नंगटपणा हा… ; अंधारेंकडून अमृता फडणवीसांचा स्विमिंगपूलमधील फोटो शेअर करत निशाणा

Sushma Andhare Amruta Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील कपड्यांवरुन सुरु झालेला वाद विकोपाला गेला आहे. यामध्ये आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी कपड्यावरून पहिल्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अंधारेंनी मिसेस फडणवीसांचे चक्क स्विमिंगपूलमधील फोटो आपल्या फेसबुक पोस्टमधून शेअर … Read more

अजित पवार यांना हिंदुस्थानातून हाकलून पाकिस्तानात पाठवा; भाजप नेत्याचा हल्लाबोल

Ajit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा. धर्मवीर म्हणू नका, असे आवाहन केले. अजितदादांच्या या विधावरून भाजपकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी “अजित पवार यांना भारतात राहण्याचा अधिकारच नाही त्यांना … Read more

ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं त्यांच्याच वंशजांनी धर्मवीर हा शब्द प्रचलित केला

Santosh Shinde Chhatrapati Sambhaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छ. संभाजी महाराज यांच्याविषयी एक वक्तव्य केले. यावरून भाजप नेत्यांकडून पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या धर्म मार्तंडांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले, मारले, त्यांच्याच वंशजाने ‘धर्मवीर’ शब्द … Read more

फडणवीसांच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावत पंकजा मुंडेंनी साजरा केला श्वानाचा वाढदिवस; Video केला शेअर

pankaja mundes dog

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरु आहेत. दरम्यान, या चर्चेला आता आणखी एका घडलेल्या घटनेमुळे उधाण मिळालेले आहे. आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला गैरहजर राहत मुंडे … Read more

महाराष्ट्राच्या प्रशासनाचं इन्फेक्शन आम्ही दूर केलंय; फडणवीसांचा पवारांना टोला

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार व विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्राच्या प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होत. ते दूर करण्याचं काम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही केलं आहे. त्यामुळं आता पुन्हा शासन-प्रशासन सुदृढ झालं आहे. शरद पवारांना एवढंच सांगेन कि नरेटिव्ह सांगायच्या आधी अनिल देशमुखांच्या … Read more

2004 मध्ये संधी असूनही पवार साहेबांनी अजितदादांना CM केलं नाही; फडणवीसांनी डिवचले

fadnavis ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना मुख्यमंत्रीपदावरून डिवचले. 2004 मध्ये संधी असतानाही शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं म्हणत फडणवीसांनी अजितदादांना डिवचण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले, दादांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. कोण मुख्यमंत्री झाले, कुठले मुख्यमंत्री झाले. पण … Read more

शिंदे -फडणवीस सरकारकडून हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मंजूर

Ravikant Tupkar Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी आज शिंदे फडणवीस सरकारकडून लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांची अनुपस्थिती होती. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. भ्रष्टाचारविरोधी कायदा म्हणून ओळखला जाणारा हा कायदा खूप महत्वाचा आहे. मुख्यमंत्रीच या कायद्याच्या कक्षेत आले तर याचा थेट संदेश राज्यातील मंत्री, सरकारी अधिकारी … Read more

फडणवीसांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय? सामनातून चौफेर टीका

RAUT FADANVIS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, ‘विरोधी पक्ष कसला बॉम्ब फोडणार? त्यांच्याकडे लवंगी फटाकादेखील नाही.’ श्री. फडणवीस यांचे हे विधान आश्चर्यकारक आहे. फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत व महाराष्ट्र लुटून खाण्याचा हट्ट सोडायला वेताळ तयार नाही. फडणवीस यांना रोज उठून भ्रष्टाचार व लुटमारीच्या नव्या प्रकरणाची वकिली … Read more

सीमावादाचा ठराव का आणला जात नाही? अजितदादांचा सवाल

Ajit Pawar eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला धारेवर धरत सीमावादाचा ठराव का आणला जात नाही? असा थेट सवाल केला आहे. बोम्मई जाणीवपूर्वक सीमावाद पेटवत असताना राज्य सरकारने ठोस प्रत्युत्तर द्यावे अशी महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे असेही ते म्हणाले. राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा … Read more