फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेची उलटी गिणती सुरू! प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात

सोलापूर । राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारच्या काळात ‘जलयुक्त शिवार’ या योजनेचा मोठा गाजावाजा झाला. मात्र या योजनेत सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या योजनेवरील आक्षेपानंतर ठाकरे सरकारकडून चौकशीचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने राज्य सरकारने चौकशी समिती गठित केली आहे. या चौकशी … Read more

सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई । शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विदेशातील सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या एकसमान ट्वीटमुळं देशात राजकारण तापलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची (Celebrities tweet) चौकशी करण्याचा इशारा आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) … Read more

राणेंप्रमाणे आता फडणवीसांचीही 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहण्यात जातील- नवाब मलिक

मुंबई । “राणेसाहेब 22 वर्ष फासे पलटवण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यांना फासे पलटवता आलेच नाहीत, तीच देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे. नारायण राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहण्यात गेली, आता देवेंद्र यांचीही जातील” असा टोला नवाब मलिक यांनी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीसांवर लगावला. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

फडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टात टिकवलंही, सध्याचं सरकार खोडा घालतंय- शिवेंद्रराजे

सातारा । राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टातही टिकवलं, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय, अशी टीका भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज केली. ते साताऱ्यातील आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. या फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले … Read more

“उद्धवजी फार चांगली कार चालवतात, पण…” देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

मुंबई । ‘सध्या मी कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चांगलाच टोला लगावला आहे. ‘उद्धवजी कार फार चांगली चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार. मात्र सरकार अशारितीनं चालवता येत नाही’, अशा शब्दात फडणवीस … Read more

राडा! अजितदादा, फडणवीसांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते भामा आसखेड (Bhama Askhed Project) योजनेचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमादरम्यान सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी व हुल्लडबाजी करण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, या गोंधळावर कार्यक्रमाला उपस्थित … Read more

‘चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी’- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नागपूर । महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक आता भारतात येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रातही यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (Investment in Maharashtra should come from China says devendra fadnavis) ”महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद … Read more

देशाचं वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीचं; आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता, म्हणून.. – फडणवीस

मुंबई । “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. याशिवाय ”या देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, याची त्यांना … Read more

केंद्रानं संसदेचं अधिवेशन रद्द केल्याने, राज्यातील भाजप नेत्यांवर तोंडावर आपटण्याची वेळ; ‘हे’ आहे कारण

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द (Parliament Winter Session) करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांची केंद्राच्या या निर्णयामुळं पुरती पंचाईत झाली आहे. राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन सध्या सुरू आहे. कोरोनाच्या … Read more

मोदी सरकार हे ‘डबल स्टँडर्ड’ सोडाच पण ‘झिरो स्टँडर्ड’; संजय राऊतांनी डागली तोफ

मुंबई । दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले. मोदी सरकार हे डबल स्टँडर्ड सोडाच पण झिरो स्टँडर्ड आहे. दिल्लीत आंदोलन करत असलेल्या पंजाबी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अर्धे लोक भारतीय लष्करात आहेत. तरीही तुम्ही त्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडून त्यांना देशद्रोही ठरवता. उद्या तुम्ही विरोधकांनाही … Read more