“माझ्या वडिलांना 2 वर्ष इंदिरा गांधींनी जेलमध्ये ठेवलं, मी ही घाबरत नाही”; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने … Read more

“चार ते पाचवेळा नोटीस बजावूनही देवेंद्र फडणवीसांनी….; पोलिसांच्या चौकशीबाबत वळसे पाटील यांचे मोठे विधान

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सागर बंगल्यात पोलिसांकडून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दोन तास चौकशी केली. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली. “पोलीस बदल्यांचा अहवाल लीक प्रकरणी फडणवीसांची एसीपी नितीन जाधव यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक यांच्या चौकशी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांना पाच ते सहावेळा नोटीस पाठवण्यात आली … Read more

“नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी”; दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून भाजप नेत्यांकडून मलिक यांच्यावर टीका केली जात असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करीत भाजपवर निशाणा साधला आहे. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी नवाब मलिक यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले … Read more

संजय राऊतांनी घेतली गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास केली चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर आज राऊत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचीही उपस्थिती होती. यावेळी राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री … Read more

गृहमंत्री वळसे- पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; 21 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर थेट मंत्र्यांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून खळबळ उडाली आहे. तर अजून 15 जणांचा अहवाल येणं बाकी आहे. यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण … Read more

विधानसभा अध्यक्षपदी असताना आपण हेडमास्तर’ सारखी भूमिका बजावली पण गृहमंत्री झाल्यावर तो दरारा कुठे गेला?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत काल भाजप पदाधिकारी जितेन गजारियाने आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “गृहमंत्री साहेब अनेकदा आपल्याला आठवण करून दिली तरी संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल … Read more

राज्यात पोलीस दलात 50 हजार पदे भरणार; दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज्य सरकारच्यावतीने अनेक घोषणा करण्यात आल्या. यावेळी राज्यातीळ युवकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पोलीस भर्तीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील महत्वाची घोषणा केली. “पोलीस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन 50 हजार पदांच्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे वळसे पाटील … Read more

वळसे पाटील, तुमच्यापेक्षा पेंग्विनना पगार जास्त”; मुनगंटीवारांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील तीन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक व सत्ताधारी यांच्यात अनेक कारणांवरून एकमेकांचे चिमटे काढण्याचे अनेक किस्से घडले. असाच किस्सा निकटच्या पार पडलेल्या अधिवेशनात घडला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पेंग्विनच्या खर्चावरून टीका करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला. “मंत्र्यांच्या पगारापेक्षा पेंग्विनचा महिन्याचा खर्च जास्त आहे. वळसे पाटील साहेब, एवढा … Read more

शक्ती कायदा विधेयकाला एकमताने मंजुरी; महिलांना मिळणार सुरक्षाकवच

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. विरोधकांकडूनही या कायद्याचे स्वागत करण्यात आले आहे. या कायद्यामुळे राज्यातील महिलांना एका अर्थाने सुरक्षा कवच मिळालं आहे. राज्यात महिला, मुली यांची फसवणूक करणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, ॲसिड हल्ला होणे अशा होणाऱ्या विविध गुन्हयांमध्ये आरोपीना कडक शिक्षा होण्यासाठी नवा कायदा आणावा … Read more

सरकार आणि कसाई यांच्यात फरक काय?; चित्रा वाघ यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या अधिवेशनात अनेक मुद्यांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्याना धारेवर धरले जात आहे. दरम्यान राज्यात 25 हजार महिला गायब झाल्याची माहितीगृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिवेशनात दिली. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. महिला गायब होण्याची माहिती देताना सरकारची … Read more