आली…आली दिवाळी आली…

अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, शोभेच्या वस्तू यांसह फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आता ग्राहकांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनीही विविध योजना बाजारात आणल्या आहेत.

यंदा दिवाळी फराळ महागात जाणार ! डाळीचे भाव भडकण्याची शक्यता

अतिरिक्त व लांबलेल्या पावसाचा यंदा तूर डाळ वगळता सर्वच डाळींना फटका बसला आहे. हरभरा डाळीच्या किमती वाढत असल्याने ऐन दिवाळीत लाडू महागणार आहे. एकूणच यंदा दिवाळीचा फराळ सर्वसामान्यांसाठी महाग असेल, असे चित्र आहे. दिवाळीतील फराळ तयार करण्यासाठी प्रामुख्याने विविध डाळींचा उपयोग होतो. हरभरा डाळीच्या बेसनापासून तयार केला जाणारा लाडू खवय्यांच्या मोठ्या पसंतीचा असतो. यामुळे त्याची मागणी सर्वाधिक असते. मात्र आता बाजारात हरभरा डाळ व बेसनाच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. पण त्या तुलनेत पीक कमी असल्याने पुढील आठवडाभरात हरभरा डाळीचे भाव भडकण्याची शक्यता आहे

धनत्रयोदशी

Happy Diwali

#HappyDiwali | दिवाळीच्या पाच दिवसांनी सरुवात हि धनत्रयोदशी ने होते या दिवशी लोक नवीन वस्तू आणि सोने चांदी खरेदी करणे शुभ मानतात. घर दिव्यांनी सजवतात. धनाची देवी धन्वंतरी ची पूजा करून अभिषेक केला जातो. असे म्हटले जाते कि यादिवशी देवी धन्वंतरी चा जन्म दिवस पण असतो. देवीची उपासना करून आपल्या परिवाराच्या स्वास्थ आणि समृद्धीची कामना … Read more