मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले; एकनाथ खडसेंची घणाघाती टीका

जळगाव । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर नाव घेऊन हल्ला चढवला आहे. मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यामुळे त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी केले. जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये … Read more

‘ड्रायक्लीनर देवेंद्रजींनी ‘त्या’ सर्वांना क्लीनचीट दिली, पण मला देऊ शकले नाही याच कारण काय?’- एकनाथ खडसे

मुंबई । गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी वारंवार व्यक्तही केली होती. मात्र, आता खडसे यांनी थेट फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला असून, त्यांना ड्रायक्लीनर असं संबोधलं आहे. … Read more

काल जन्माला आलेले नेते, आम्हाला अक्कल शिकवू लागलेत! खडसेंची फडणवीसांचे नाव न घेता टीका

जळगाव । काल जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत अशा शब्दांत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही असा सुचक इशाराही खडसे यांनी दिला … Read more

वाढीव वीज बिलाचा एकनाथ खडसेंनाही बसला ‘शॉक’; महावितरणने पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं बिल

जळगाव । महावितरणने वीज ग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’ राजकीय नेत्यांना सुद्धा बसला आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांना जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे. एप्रिल ते जुलै अशा ४ महिन्यांचं हे बिल आहे. एकनाथ खडसे यांनी वापर कमी असूनही इतकं वीज बिल आल्याने आश्चर्य व्यक्त केलं … Read more

भाजप जुलैमध्ये नवीन राज्य कार्यकारणी गठीत करणार; नाराज पंकजा-खडसेंना स्थान मिळणार का?

मुंबई । भाजपात जुलैमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारिणीत पक्षातील निष्ठावंतांना स्थान देण्याबाबत विचार सुरु आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर या सर्व फेरबदलामध्ये आता पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना पक्ष कोणती जबाबदारी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची … Read more

विधानपरिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती, उलट मला नको, असं म्हणालो होतो- विनोद तावडे

मुंबई । विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली असली तरी उमेदवारीच्या मुदद्यावरून भाजपमध्ये सुरू झालेली धुसफूस कायम आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, राम शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. खडसे यांनी तर आपल्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे,पंकजा मुंडे या सर्वांची विधानपरिषदेसाठी नाव फायनल झाली असताना राज्यातील नैत्रुत्वाने केंद्रात कुरापती करून आमची … Read more

खडसेंना डावलण्याचा प्लॅन दिल्लीत शिजला; राज्यातील भाजप नेतृत्वात ती ताकदच नाही- पृथ्वीराज चव्हाण

पुणे । विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने एकनाथ खडसे यांनी संतापून राज्यातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यावरून खडसे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बराच कलगीतुराही रंगला आहे. दरम्यान आज भाजप-खडसे वादावर माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण एक गौप्यस्फोट केला आहे. ”आपल्या नेतृत्वाला अडचण होईल म्हणून खडसे नसलेले बरे, हा प्लान दिल्लीत … Read more

खडसे-भाजपा वादावर नितीन गडकरी, म्हणाले..

नागपूर । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारी न दिल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ यांनी राज्यातील पक्ष नैतृत्वावर जाहीर टीका आहे. राज्यातील नेत्यांमुळे तिकीट मिळालं नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. निष्ठावंतांना डावलून भाजपानं उपऱ्यांना संधी दिल्याचा आरोप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली. यावरून बराच कलगीतुरा … Read more

पक्षाच्या ‘त्या’ नियमाला पडळकर अपवाद का? खडसेंनाचा चंद्रकांतदादांना परखड सवाल

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत राज्यातील नेत्यांना धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत “विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे. पंकजा … Read more

दादा! भाजपाचा उमेदवार म्हणजे पराभव निश्चित, त्याकाळापासून मी मार्गदर्शक आहे – एकनाथ खडसे

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपानं टिकत वाटपात डावल्यानंतर खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत राज्यातील नेत्यांना धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत एकनाथ खडसे यांना पक्षानं भरपूर दिलं आहे, असं सांगत खडसे यांच्याविषयीची यादीच त्यांनी सांगितली होती. त्याचबरोबर … Read more