दादा खरं बोलले, मेगाभरतीमुळेच भाजपनं सरकार घालवलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर
पाटील यांच्या याच विधानाचा धागा पकडून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा खदखद व्यक्त केली.
पाटील यांच्या याच विधानाचा धागा पकडून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा खदखद व्यक्त केली.
नेवासा प्रतिनिधी | भाजप नेते एकनाथ खडसे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा गेली अनेक दिवस झाले सुरु आहेत. रोहिणी खडसे यांच्या पराभवामुळे खडसे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र आता आपण पक्षावर नाही तर पक्षातील फडणवीस टीमवर नाराज असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. नेवासा येथे पत्रकारांशी खडसे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल … Read more
टीम हॅलो महाराष्ट्र : भाजप नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. पण ही भेट फक्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीपुरती मर्यादित होती असे स्पष्ट करत मला आमदारकीच किंवा मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी हा विषय मी सोडून देणार नाही, माझी नाराजी कायम आहे असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना … Read more
भाजपला महाराष्ट्रात उभे करण्यात खडसेंचाही वाटा आहे. मागील ४५ वर्षाहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या ५ वर्षात खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.
फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्याशी आम्ही संवाद साधू. पंकजा मुंडे यांना जेव्हा जेव्हा टार्गेट केलं गेलं तेव्हा मी कायमच त्यांच्या बाजूने उभा राहिलो आहे. त्यामुळे माझ्या मनात पंकजा मुंडे यांच्याबाबत आदराचीच भावना आहेच,
‘पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी बहुजनवाद काढलाच. हे असले वाद, आपली रडकथा प्रभावी करण्यासाठी फारच उपयुक्त असतात, अशा शब्दात नागपूर मधील एका वृत्तपत्राने या दोघांवर निशाणा साधला आहे.
ज्याला मोठं केलं त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हणत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढला आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त परळीमधील गोपीनाथ गडावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडसे बोलत होते.
पंकजाचा परळी मधील पराभव हा झाला नसून घडवून आणला असल्याची टीकाही खडसेंनी केली आहे. त्यामुळे पंकजांना देखाली पक्षात खूप त्रास दिला जात आहे. परंतु त्यांना बोलता येत नाही असंही खडसेंनी सांगितलं आहे. पक्षांतरावर बोलताना खडसे म्हणाले कि कितीही त्रास झाला तरी सध्या पंकजा पक्ष सोडणार नाही.
दिल्ली दरबारी गेलेल्या खडसेंना पक्ष नेतृत्वाने भेट नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्या लागोपाठ भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे याचा पत्ता कुणालाही लागत नाही.
भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर भाजपमध्ये सध्या खळबळ निर्माण झाली आहे. मात्र, याभेटीबाबत भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक विधान केलं आहे. माध्यमांशी याबाबत बोलत असतांना एकनाथ खडसेंच्या मनात काय आहे जाणून घेण्याचा प्रयन्त भाजप करत आहे. तसेच त्यांच्या आम्ही संपर्कात असून त्यांचे जे काय मतभेद आहेत ते आम्ही दूर करू असे सांगितले.