महाराष्ट्र किती झुकलाय हे पाहायला मिळतंय; जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Jayant Patil Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी दिल्लीत नीती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीतील पंतप्रधान मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे असल्याचा एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला विषय ठरला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. “औरंगजेबाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी गेले, दुसऱ्या … Read more

देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत; हा मराठी माणसाचा अपमान?

Rohit Pawar tweet Eknath Shinde photo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज नीतीआयोगाची सातवी बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पण या बैठकीत काढण्यात आलेल्या फोटोत मुख्यमंत्री शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे असल्याचे दिसून आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत केंद्राविरोधात नाराजी व्यक्त केली … Read more

‘मिशन 48’ हे भाजप आणि शिवसेना युतीचं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ‘मिशन 48’ राबवणार असल्याचे आज भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजपकडून मिशन 48 राबविणार असल्याने शिंदे गटाबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. “भाजप मिशन 48 राबवत आहे ही चांगली गोष्ट आहे. मिशन 48 हे भाजप आणि शिवसेनेचं … Read more

युतीच्या सरकारला पाठिंबा देऊन आम्हाला आशीर्वाद द्या…; Friendship Day निमित्त शंभूराज देसाईंचं ठाकरेंना आवाहन

Shambhuraj Desai Uddhav Thackeray

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. यावर्षी 07 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे आला असल्यामुळे मैत्रीचा हा खास दिवस साजरा होत आहे. या मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे बंडखोर आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे. “शिवसेनाप्रमुख … Read more

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?; दिल्लीवारीत फडणवीस म्हणाले की…

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल एक महिना झाला तरीही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला जात आहे. अशात काल दोघांच्या दिल्लीवारीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होणार असे वाटत होते. मात्र, आज फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं आहे. “आम्ही … Read more

… म्हणून शिंदे गटातील आमदार अपात्र होऊ शकतात; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

EKNATH SHINDE PRITHVIRAJ CHAVAN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात आहे. १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची कारवाईवर महत्वाची सुनावणी आहे, याच संदर्भात काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत,असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे . ते एका वृत्तवाहिनीशी … Read more

आम्ही आता परत कधी ठाकरेंच्या दारात जाणार नाही; दानवेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर भाजपचे नेते आणि तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच मुळची शिवसेना आहे. 25 वर्ष आम्ही युती केली ठाकरेंना वाटलं आपलं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांनी साथ सोडली. आम्ही आता परत … Read more

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबणीवर? मंत्रिमंडळ विस्तारही रखडण्याची शक्यता

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. मात्र याप्रकरणी उद्या होणारी सुनावणी लांबणीवर पडली असून १२ ऑगस्टला पुढील सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. सुनावणी लांबल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबतो का? हे सुद्धा आता पाहावे लागणार आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जे खंडपीठ सोमवारी बसणार होते ते सोमवारी … Read more

शिंदे – फडणवीसांनी लोकशाहीचा मुडदा पाडला; अजित पवारांची घणाघाती टीका

Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक महिना झाला तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत राज्यातील जनतेचे संबंधित कामे थांबू नयेत, यासाठी मुख्यमंत्री शिंदेनी सर्व विभागांच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या या संबंधित विभागांच्या सचिवांकडे सोपावल्या आहेत. यावरून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी शिंदे – फडणवीसांवर निशाणा साधला. “तुम्ही दोघांनी मंत्री व्हायचं, पण … Read more

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला असल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच होईल. यासाठी पुढचा आठवडा वाट पहावी लागणार नाही,असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्री शिंदे आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या … Read more