माण तालुका कृषी बाजार समितीत आ. जयकुमार गोरे, रासपची सत्ता तर राष्ट्रवादी काॅंग्रेसला 7 जागा ः शेखर गोरेंवर नामुष्की एकही जागा नाही

दहिवडी | सातारा जिल्ह्यातील माण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 17 जागांपैकी भाजपच्या आ. जयकुमार गोरे यांना 6, रासपचे बबन दादा वीरकर यांना 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाकर देशमुख यांना 7 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत मात्र शिवसेनेचे शेखर गोरे यांना एक ही जागा मिळवता आलेली नाही. निकाल लागल्यानंतर पुन्हा फेर मतमोजणी घेण्यात आली. … Read more

चाफळ ग्रामपंचायतीत सत्तांतर : पाटणकर गटाचे अशिष पवार सरपंचपदी बिनविरोध

पाटण | पाटण तालुक्यातील चाफळ गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेनचे लोकनियुक्त सरंपच सूर्यकांत पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. शिवसेनेकडून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे देसाई गटाच्या सरपंचाच्या निधनाने पाटणकर गटाचे सदस्य जादा असल्याने बिनविरोध सत्तांतर झाले. चाफळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपद रिक्त होते. त्यासाठी … Read more

निवडणूक लागली : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 7 ऑगस्टला मतदान

सातारा | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नव्या कारभारांच्या निवडीसाठी 7 ऑगस्टला मतदान, तर 8 ऑगस्टला निकाल लागणार आहे. बाजार समितीच्या अनुषंगाने बैठकांना सुरुवात झाली असताना आज अधिकृतरित्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला. बाजार समितीसाठी 6 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. इच्छुकांना 12 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : मनोमिलनाबाबत आशावादी म्हणत अविनाश मोहितेंवर इंद्रजित मोहितेंचे टीकास्त्र

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकाभिमुख, लोकांसाठी असा कारखाना निर्माण करू इच्छित आहोत. आताच्या आणि मागच्या दोन्ही गटाच्यामध्ये त्यांची उणीव होती. तरी आम्ही सर्वांना एकत्रित करून आणून सर्वांच्या प्रयत्नानी एकसंध राहण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु तो प्रयत्न अद्यापतरी पूर्णत्वास नेता आलेला नाही. तोपर्यंत अर्ज भरण्याचा अवधी संपेल म्हणून सर्व 21 जागेवर त्याच्या डमीसह अर्ज भरण्याची … Read more

गोकुळ दूध संघात सत्तांतर ः सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता, महाडिक गटाला हादरा

Kolhapur

कोल्हापूर | पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित गोकुळ दूध संघामध्ये अखेर तीन दशकांनंतर सत्तांतर झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शाहू शेतकरी आघाडीने  21 पैकी 17 जागा मिळविल्या आहेत. तर सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागले आहे. आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची तीन दशकांची गोकुळमधील सत्ता … Read more

BREKING NEWS : गोकुळ दूध संघात सत्तातरांचे संकेत, सत्ताधारी पिछाडीवर

Gokul Kolhapur

कोल्हापूर | गोकुळ दूध संघाची मतमोजणीत पालकमंत्री सतेज पाटील व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला सलग तीन जागेवर विजय मिळाला आहे. तर विरोधी गटाचे अनेक उमेदवार हे मतामध्ये आघाडी घेवून असल्याने गोकुळमध्ये सत्तातांराचे संकेत दिसू लागले आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पहिले तीन निकाल राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या बाजूने … Read more

नादखुळा ! बिगबाॅस फेम सातारकर अभिजित बिचुकलेचे पोटनिवडणुकीत सहाव्यांदा डिपाॅझिट जप्त

Satara Abhijit Bichukle

पंढरपूर | पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत बिगबॉस फेम साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांना १३७ मते मिळाली आहेत. पंढरपूर पोटनिवडणूकीत त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले असून आतापर्यंत अभिजीत बिचकुलेचे सहावेळा डिपॉझिट जप्त झाले आहे. तरीही त्यांची निवडणूक लढण्याची हौस फिटलेली नाही. अभिजित बिचुकले हे 2004 साली सातारा पालिकेची निवडणुक यश मिळाले नाही. 2014 मध्ये अभिजित बिचुकले आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात … Read more

BREKING NEWS : पंढरपूर- मंगळवेढ्यात अखेर भाजपचं “समाधान”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आज (2 मे) मतमोजणीचा दिवस होता. कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आले असल्याने मतमोजणी संथगतीने होत होती. अखेर पंढरपूर- मंगळवेढ्यात भाजपचे समाधान आवताडे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले आहेत. यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या या निवडणुकीची उत्सुकता … Read more

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूकीत भाजपाचे कमळ विजयाच्या उंबरठयावर

BJP NCP Logo

सोलापूर| राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला कमळ फुलविण्यात यश मिळताना दिसत आहे. अद्याप 7 फेऱ्यांची मतमोजणी बाकी असली तरी भाजपाचे समाधान आवताडे हे तब्बल 6 हजार 112 मतांनी आघाडीवर आहेत.

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे राज्याच लक्ष लागलं आहे. मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवाती झाली होती. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी 3 लाख 40 हजार 889 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केलं आहे. विधानसभा मतदारसंघात 65.73 टक्के मतदान झाले. या मतमोजणीसाठी 118 अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत 2 मे रोजी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. 14 टेबलांवर 38 फेऱ्यात मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीसाठी 6 टेबल राखीव ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानाच्या मोजणीसाठी दोन टेबल ठेवण्यात आलेत. तसेच 54 अधिकारी, कर्मचारी आणि मदतनीस राखीव ठेवण्यात आलेत. टपाली मतदानाद्वारे 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी 3 हजार 252 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच 73 सैनिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

कोरोना चाचणी बंधनकारक

मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच इतरांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्यांनी कोरोना चाचणी केली नाही, अशा संबंधितांसाठी मतदान कक्षाबाहेरील आरोग्य कक्षात चाचणी केली जाईल. तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांनाच मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.

Read more

पश्चिम बंगाल ः ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकणारे सुवेंदू अधिकारी कोण?

कोलकात्ता | पश्चिम बंगालमधील नंदीग्रामच्या जागेवर तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असलेले भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. दोन्ही उमेदवारांच्यात आघाडी-पिछाडीमध्ये फार मोठा फरक नाही, मात्र सध्यातरी ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकणारे सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. कोण आहेत सुवेंदू अधिकारी ? ममता बॅनर्जी यांचेच पूर्वी जवळचे सहकारी असणारे सुवेंदू अधिकारी वाहतूक मंत्री होते. निवडणूकीच्या … Read more