धुमशान : सातारा जिल्ह्यात 8 पालिकांचा बिगुल वाजला

State Election Commission

सातारा | निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या प्रारुप रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या 8 पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.2 मार्चपासून प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 8 पालिकांच्या निवडणुकींच्या हालचाली … Read more

तांबवे ग्रुप विकास सेवा सोसायटीत भैरवनाथ पॅनेल विजयी

कराड | तांबवे ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत भैरवनाथ पॅनेलने सर्वच्या सर्व 13 जागांवर एकहाती विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले आहे. अटीतटीच्या लढतीत सत्ताधारी पॅनेलने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. सत्ताधारी पॅनेलमधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः संदीप पाटील, भगवान बाबर, महादेव बाबर, रघुनाथ मोगरे, प्रविण पाटील, भरत पाटील, अण्णासो पाटील, अनिल पाटील, … Read more

कराड उत्तरमधील नडशीत काॅंग्रेसचा विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उत्तर विधानसभा मतदार संघातील नडशी गावच्या वि. का. स. सेवा सोसायटी निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी त्यांचे नेतृत्वातील सिद्धेश्वर विकास पॅनेलने माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 13 जागापैकी 11 जागा जिंकून सोसायटीवर आपले वर्चस्व अबाधित राखले … Read more

साताऱ्यात दोन्ही राजेंना राजघराण्यातूनच पालिका निवडणुकीत आव्हान? : वृषालीराजेंचे संकेत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राजघराण्यातील सदस्यांचे मोठे आवाहन उभे ? वृषालीराजे भोसले यांनी दिले आहे. सातारा नगर पालिका निवडणुक लढवण्याचे संकेत दिल्याने शिवजयंतीदिनी राजकीय चर्चांना उधाण आले. तसेच दोघांना तिसरा पर्याय मिळणार की कसे हे पुढील काही दिवसात समजणार असल्याचे राजकीय जाणकरांकडून सांगितले जात आहे. साताऱ्यात छत्रपती … Read more

विरोधकांचा धुव्वा : सुपने विकास सेवा सोसायटीत उंडाळकर गटाचा 13/0 ने विजय

कराड | सुपने (ता. कराड) येथील विकास सेवा सोसायटी अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचे नेतृत्व मानणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या सुपने विकास पॅनेलने एकहाती 13-0 अशी सत्ता अबाधीत ठेवली आहे. तर विरोधी संत नावजी महाराज पॅनेलचा धुव्वा उडविला. सुपने विकास सेवा सोसायटीत विजयी उमेदवार व त्यांची मते कंसात पुढीलप्रमाणे  सर्वसाधारण … Read more

तरडगावला विकास सेवा सोसायटीत राजे गटाची सत्ता

Ramraje

फलटण | तरडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत राजे गट पुरस्कृत ग्रामदैवत भैरवनाथ पॅनलचे सर्व 13 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या निवडणूकीत 1168 सभासदांनी मतदान केले त्यापैकी 1085 वैध आणि 83 मते अवैध ठरली. राजे गट पुरस्कृत भैरवनाथ पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात खालीलप्रमाणे – सर्वसाधारण मतदार … Read more

ओबीसी आरक्षण नाही, तोपर्यंत निवडणुका नको अन्यथा राज्यभर आंदोलन

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय नको ओबीसी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नवाज सुतार यांनी याबाबतची मागणी केली आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत निवडणुका होवू नयेत अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू असा इशारा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवाज सुतार यांनी दिला आहे. यावेळी सर्व पदाधिकारी यांनी स्पष्ट केले याबाबतचे … Read more

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मणिपूरमध्ये

औरंगाबाद – औरंगाबादेतील नेत्यांना शिवसेनेचा सर्वात मोठा नेता मीच आहे, बाकीच्यांशी माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी टाकलेली दिसून येत आहे. औरंगाबादचे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सध्या मणिपूरमध्ये शिवसेनेच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अन्य काही पदाधिकारी आणि शिवसैनिकदेखील आहेत. मणिपूर विधानसभेच्या प्रचार … Read more

निवडणूक रद्द न केल्यास सहकार मंत्र्यांना घालणार घेराव; आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके जावळी तालुक्यातील सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीस आता आरपीआय कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. आज रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी उपनिबंधक जावळी यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले. तसेच कारखान्याची निवडणूक रद्द न केल्यास सहकार मंत्र्यांना घेराव घालू, असा … Read more

विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकामुळे गावागावात राजकारण तापले

Election

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता विकास सेवा सोसायटीच्या निवडणुका लागल्या आहेत. विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकामुळे गावा- गावातील व भावकी- भावकीतील राजकारण चांगलेच तापलेले आहे. पाच वर्षांनी होणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र जिल्हा बॅंकेच्या ठरावासाठी व आपल्यालाच मत मिळावे, यासाठी नेत्यांनी चांगलीच कंबर कसलेली … Read more