आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनाची प्रवीण दरेकरांनी उडवली खिल्ली, म्हणाले..

मुंबई । गेल्या ६० दिवसांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आज मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी मोर्चा पार पडला. या मोर्चाला पाठिंबा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही … Read more

कृषी कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातही ‘ट्रॅक्टर मोर्चा; राजू शेट्टींची घोषणा

कोल्हापूर । अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी आझाद मैदान येथे दाखल झाला. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात विविध वाहनांतून हजारो शेतकरी मुंबईत आंदोलनात दाखल झाले असून, सोमवारी जाहीर सभेने शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनाच्या दिशेने निघणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत असल्याचे … Read more

8 जानेवारीपर्यंत सरकारने MSP वर खरेदी केले 531 लाख टन धान्य, 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना झाला फायदा

नवी दिल्ली । चालू खरीफ मार्केटिंग हंगामात (Kharif Marketing Season) सरकारने किमान आधारभूत किंमतीने (Minimum Support Price) 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडून आतापर्यंत 531.22 लाख टन धान्य खरेदी केले आहे. ही खरेदी सरकारने एक लाख कोटी रुपयांमध्ये केली आहे. तीनही नवीन कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना सरकार धान्य खरेदी … Read more

Viral Video: “हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे”; सचिन पायलटांचा घणाघात

नवी दिल्ली । राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.”आपण सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या हिताबाबत, कल्याणाबाबत बोलणं हा खरा राष्ट्रवाद आहे. हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे” अशा शब्दांत सचिन पायलट यांनी ऩिशाणा साधला आहे. भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी … Read more

नाराज शेतकऱ्यांचा भाजपला दणका! हरियाणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दारुण पराभव

चंदीगढ । केंद्रातील मोदी सरकाराच्या कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाने पंजाब, हरियाणातील वातावरण तापलेले आहे. याचा थेट फटका भाजपाला हरियाणातील नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकामध्ये बसल्याचे दिसत आहे. येथील दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका भाजपाला गमवाव्या लागल्या आहेत. हरियाणामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज लागलेआहेत. तीन नगरपालिका निवडणुकीत भाजपा-जेजेपी आघाडीला मोठा झटका लागला आहे. तिन्ही … Read more

पंजाबमध्ये टेलिकॉम टॉवर्स पाडल्यामुळे 1.5 कोटी मोबाईल यूजर्स झाले प्रभावित

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान टेलिकॉम टॉवर्समधील मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात घरून अभ्यास करणारे विद्यार्थी आणि वर्क फ्रॉम होम व्यावसायिकांपर्यंतचे सर्वजण अडचणीत आलेत. या तोडफोडीमुळे सुमारे दीड कोटी ग्राहक बाधित झाले आहेत. विशेष म्हणजे आज शेतकरी निदर्शनाचा 35 वा दिवस आहे. … Read more

केंद्राने कृषी कायदे रेटून नेले असून दिल्लीत बसून शेती करता येत नाही; शरद पवारांचा टोला

Sharad pawar

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांवरुन दिल्लीत शेतकऱ्यांचं महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही मोदी सरकारकडे शेतकरी हित लक्षात घेत कायदे मागे घेण्याची वारंवार विनंती केली आहे. दरम्यान आज पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. “राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत … Read more

आंदोलक शेतकऱ्यांचा ‘रिलायंस जिओ’ला हिसका; १,३०० मोबाईल टॉवर्सचा तोडला वीजपुरवठा

नवी दिल्ली । गेल्या महिन्याभरापासून देशभरातील शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. मोदी सरकारने नवे कृषी कायदे केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी आणले असल्याचा थेट आरोप शेतकरी करतायत. यात सर्वात आघाडीवर अदानी आणि अंबानी हे कॉर्पोरेट घराणे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे मोदी सरकार आपले कृषी कायदे रद्द … Read more

रामाच्या नावावर राज्य करणारे केंद्र सरकार मात्र, वचनं पळत नाही!, पुन्हा निर्णायक आंदोलन करणार- अण्णा हजारे

अहमदनगर । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन इशारा दिला आहे. यानंतर अण्णा हजारे यांची भेट घेऊन भाजप नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी हजारे ठाम असून भाजपवर त्यांनी पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. एका बाजूला रामाचे नाव घेऊन राज्य करायचे आणि दुसरीकडे प्रभू राम यांचा आदर्श बाजूला सारून दिलेली … Read more

कृषी कायदे: अंबानींच्या ‘रिलायन्स जिओ’ला शेतकऱ्यांचा दणका! आंदोलक शेतकऱ्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली । गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन (Farmer Protest) करत आहेत. मोदी सरकारने नवे कृषी कायदे केवळ मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी आणले असल्याचा थेट आरोप शेतकरी करतायत. यात सर्वात आघाडीवर अदानी आणि अंबानी हे कॉर्पोरेट घराणे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे मोदी सरकार आपले कृषी कायदे रद्द करण्याच्या कुठल्याच … Read more