पोलिस स्टेशनमध्ये शेतकऱ्याची गांधीगिरी, ज्ञानेश्‍वरी पारायण करत केले आंदोलन

बुलढाणा प्रतिनिधी | ताट-वाटी वाजवून, दारासमोर कचरा टाकून, घंटानाद करून, रस्त्यावर घोषणा देऊन आंदोलन केल्याची विविध उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण पोलीस स्टेशनमध्येच ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण करत आपलं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट तुम्हाला माहित आहे का ? सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी खुर्द गावच्या लिंबाजी विठोबा डोईफोडे या शेतकर्‍याने असेच एक आंदोलन चालू केले आहे. डोईफोडेनी त्यांच्या … Read more

धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल? या गावातील शेतकर्‍यांची मागणी

बीड प्रतिनिधी | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पूस गावांतील शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून जमीन व्यवहारात फसवणूक केली असल्याचा दावा शेतकरी करत आहे. दरम्यान धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्याचे सहकुटुंब धरणे आंदोलन … Read more

धक्कादायक! भाजप नेत्याकडून शेतकरी कुटुंबाला खड्डयात टाकून जेसीबीच्या साहाय्याने बुजवण्याचा प्रयत्न

Untitled design

जालना प्रतिनिधी | भाजप किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्षाने एका शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण करत त्यांना खड्डयात टाकून जेसीबीच्या साहाय्याने बुजवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. भाजप कार्यकारणीची शहरात बैठक सुरु असताना सदर प्रकार घडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभारड यांच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब … Read more

कांद्याला दिलेल्या अनुदानात मंत्र्यांच्या कपड्याची इस्त्रीही होणार नाही : बच्चू कडू

Bachhu Kadu

चांदवड | सरकरने शेतकऱ्यांची पिळवणूक करत कांद्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ‘सरकारने दिलेल्या अनुदानात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कपड्यालाही इस्त्री होणार नाही’ असा टोला कडू यांनी यावेळी लगावला. कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्यावर … Read more

स्वतःला स्मशानभूमीतील खड्डयांत गाडून घेतले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

Shwabhimani Shetkari Sanghatna

शेगाव | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. स्वत:ला स्मशानभूमीतील खड्ड्यांत गाढून घेत आंदोलक शेतकर्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले. बुधवारी सकाळी शेगाव जवळील संग्रामपुर तालुक्यातील निरोड येथील स्मशानभूमीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत … Read more