PM Kisan Samman Nidhi: या दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात येतील पैसे, पंतप्रधान मोदी म्हणाले

money

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi Scheme) च्या 7 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. शुक्रवारी मध्य प्रदेशातील शेतकरी संमेलनाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, किसान निधीचा पुढील हप्ता 25 डिसेंबरला जाहीर केला जाईल. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता … Read more

26 गुंठ्यांत घेतले 72 टन ऊसाचे उत्पादन; कराड तालुक्यातील शेतकर्‍याची किमया

कराड प्रतिनिधी | येथील आनंदराव विलासराव खुडे यांनी अथक मेहनतीतून उत्पादनातील सांशकतेला छेद देत ऊस शेतीत विक्रम नोंदवला आहे. केलेल्या खर्चाच्या बरोबरीपेक्षाही तिपटीने उत्पादन घेत शेतीत जणू त्यांनी सोनेच पिकवण्याची किमया साधली आहे. २६ गुंठ्यांत तब्बल ७२ टनांचे उत्पादन घेत आनंदरावांनी सातारा जिल्ह्यात कृष्णाकाठी विक्रम रचला आहे. रेठरे बुद्रुक (Rethake Budruk) शेणोली (ता. कऱ्हाड) (Shenoli). … Read more

शेतकऱ्यांना हवे संरक्षित स्वातंत्र्य – प्रा.सुभाष वारे

पुणे | गेली ४८ वर्षाची सत्यशोधकी विचारांची परंपरा राखत महात्मा फुले समता प्रतिष्ठान, ग्रंथालय व वाचनालय आयोजित फुले आंबेडकर व्याख्यानमालेचे चौथे सत्र पार पडले. केंद्राचा सुधारित कृषी कायदा या विषयावर कॉ.किशोर ढमाले यांनी वक्ता व प्रा.सुभाष वारे यांनी अध्यक्ष या नात्याने भूमिका मांडली. किशोर ढमाले यांनी कल्याणकारी राज्याच्या भूमिकेत रेशनची व्यवस्था आणि बाजार समितीची रचना … Read more

शेतकर्‍यांसाठी बातमी – धान्यासाठी सरकार आणत आहे नवीन योजना, 15 राज्यांत सुरू झाला पायलट प्रोजेक्ट

farmers furtilizers

नवी दिल्ली । देशातील पोषण सुरक्षेला व्यावहारिक रूप देण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने तांदूळ पौष्टिक व सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे त्याचे वितरण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत पायलट प्रकल्प राबवला आहे. ही पायलट योजनेला 2019-20 पासून तीन वर्षांसाठी मान्यता देण्यात आली असून त्यासाठी एकूण 174.6 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक देण्यात आले आहे. या पायलट … Read more

PM Kisan Samman Nidhi: 31 मार्चपर्यंत तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम, अन्यथा तुम्हाला 6000 रुपये मिळणार नाहीत!

नवी दिल्ली । तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत वार्षिक 6000 रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरिफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये या योजनेचे पैसे मिळण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत आधार लिंक करावे लागेल. अन्यथा पैसा थांबेल. यानंतर सरकार कोणतीही संधी देणार नाही. अशा राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालय यांचा समावेश आहे. अन्य राज्यात … Read more

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी! आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या सहामाहीत कृषी निर्यातीत झाली वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबर 2020 दरम्यान कृषी उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 43.4 टक्के अधिक कृषी उत्पादनांची देशातून निर्यात झाली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने माहिती दिली की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 53,626.6 कोटी रुपयांची … Read more

सोयाबीन खरेदी नोंदणीची सुरुवात १ ऑक्टोबर पासून होणार सुरु; ३ हजार ८८० रुपये हमी भाव जाहीर

Soyabeen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात १५ ऑक्टोबर २०२० पासून होणार आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी सांगितले की, केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे सोयाबीन हमी भाव ३ … Read more

दिलासादायक ! परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

Parbhani Flood

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार … Read more

‘शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’; युवक काँग्रेस चा निर्धार

पुणे प्रतिनिधी | शेतकऱ्यांवर अन्याय करणारी ३ कृषी विधेयके राज्यसभेत मोदी सरकारनेहुकूमशाही पद्धतीने रेटून नेली ,याचा तीव्र निषेध महाराष्ट्र युवक काँग्रेसने  केला आहे.  ‘कृषीसंस्कृती कार्पोरेट  मित्रांच्या  दावणीस बांधू नका’ असा इशारा देत ‘  शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण’,असा निर्धार आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी  पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केला आहे . कृषी विधेयके मांडताना मोदी सरकारने संसदीय पद्धतीला फाटा दिला. मतदानाची विनंती फेटाळली .या विधेयकावर … Read more

‘अशी’ पेरणी तुम्ही या अगोदर कधीच पाहिली नसेल; पहा हा भन्नाट व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय माणुस जुगाड करण्यात नेहमीच वरचढ ठरतो. यात शेतकरी मित्रही काही कमी नाहित. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Social Media Viral Video) होत आहे. अभिनेता अर्शद वारसीनं (Arshad Warsi) एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी अत्यंक अनोख्या पद्धतीने पेरणी करताना दिसत आहेत. https://twitter.com/ArshadWarsi/status/1306784776095969281 सदर व्हिडीओ … Read more