पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर पाण्याचा मोठा विसर्ग; पहा व्हिडिओ

Dagdusheth Ganpati

पुणे प्रतिनिधी | पुण्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात रस्त्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Ganpati) गणपतीसमोरील रस्त्यावरही पाण्याचा मोठा विसर्ग चालू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. #WATCH: Heavy … Read more

पुणेकरांची झोप उडाली! शहरात सर्वत्र पाणीचपाणी; सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. Pune: Water logging in parts of Indapur … Read more

नदीत बुडून दोन बहिणीचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | गावातील महिलांसह नदीवर अंघोळीला गेलेल्या दोन तरुण बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील खामगाव येथे घडली.या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरती कैलास कवडे वय-22 वर्षे, ऋतुजा शिवाजी कवडे वय-18 वर्षे अशी पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या दुर्दैवी … Read more

दिलासादायक ! परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

Parbhani Flood

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार … Read more

पूर्व विदर्भातील भागांचे नुकसानीचे पंचनामे करून पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या!- देवेंद्र फडणवीस

नागपूर । पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर बनली असून, पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्य सरकारने या भागात तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उद्भवली आहे. राजीवसागरचे … Read more

राज्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती; मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 16 टीम तैनात

मुंबई । मुंबई, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासनाची आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 16 टीम राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन व सर्व आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. … Read more

पाण्यामध्ये तरंगणारी बँक ! SBI कशाप्रकारे देत आहे कॅश; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक आता मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरातही लोकांना बँकिंगची सुविधा पुरवित आहे. या कठीण काळात एसबीआय पूरग्रस्त आसाममधील लोकांना मदत करत आहे. एसबीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. एसबीआय म्हणते की, आसाममधील एसबीआय कुटुंबातील सदस्य (आसाम) पूरग्रस्त गावांमधील लोकांना बँकिंग सेवा आणि सपोर्ट करीत आहेत. … Read more

आसाम मधील पुरात ७१ लोकांचा बळी; ३९ लाखांपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका

आसाम । आसाममध्ये मुसळधार पावसाने कालपासून हजेरी लावली आहे. त्यामुळे तिकडे पूरस्थिती तयार झाली आहे. आसाममधील २७ जिल्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यामध्ये ७१ लोकांचा बळी गेला असून कितीतरी कोटींमध्ये नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून दिली गेली आहे. आसाममधल्या पुरामध्ये ७१ लोकांना जीव गमवावा लागला आहे तर ३९ लाखांपेक्षा जास्त लोकांना या पुराचा … Read more

कराडात NDRF च्या तुकड्या दाखल; खबरदारी म्हणून निर्णय

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कराड येथे  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची (एनडीआरएफ) एक तुकडी दाखल झाली. या तुकडीतील जवानांनी कराडच्या प्रीतिसंगमावर पोलीस, महसूल आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक दाखवले. बोट चालविण्याचे प्रशिक्षण देऊन आपत्तीच्या काळात पुराच्या पाण्यात बुडणाऱ्यांना कसे वाचवायचे, त्यांना बोटीत कसे घ्यायचे, याचे प्रात्यक्षिक एनडीआरएफच्या जवानांनी दाखवले. पुरातून बाहेर … Read more

पुराच्या पाण्यातून गुरे वाहून जातानाचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरु असून अनेक गावांमध्ये पूर आला आहे. येथील जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झाले असून सध्या पूरस्थिती गंभीर झाली आहे. गुजरातच्या खिजडीया मोटा या गावात पुराच्या पाण्यामध्ये जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. पडधरी, राजकोट या परिसरात होणाऱ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये संततधार सुरु असल्याने गावांनी … Read more