शेणोली येथे विहीरीत वन्यप्राणी सांबर पडले

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील शेणोली येथे एका विहीरीत आज रविवारी दि. 17 रोजी वन्यप्राणी सांबर पडले होते. वनविभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने या सांबरास वाचविण्यात यश आले आहे. वनविभागाने वाचविलेल्या सांबरास शेणोली वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडले आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कराड तालुक्यातील शेणोली येथील सुहास कणसे यांच्या विहिरीत वन्यप्राणी सांबर पडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची … Read more

कास बारमाही खास : पर्यटकांसाठी आता 3 तासाची जंगल नाईट सफारी

सातारा | जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर जगभरातून लाखो पर्यटक हे रंगीबेरंगी फुलांचे गालिचे पाहण्यासाठी येत असतात. वर्षातील दोन- तीन महिने या हंगामात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. मात्र, आता पर्यटक बारमाही कास पठारावर  पठार फिरायला यावेत व त्यातून स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी, या हेतूने नाईट जंगल सफारी सुरू करण्यात येणार आहे. सातारा उपवनसंरक्षक … Read more

शिकारीसाठी जंगलात गेले अन चक्क घोरपडीवरच केला बलात्कार; Video पाहून वन खातेही चक्रावले

कोल्हापूर | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. विनापरवाना शस्त्रासह शिकारीसाठी घुसलेल्यांनी माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे. शिकारीसाठी म्हणून जंगलात गेलेल्या काहींनी चक्क घोरपडीवरच बलात्कार केला आहे. संशयित आरोपीचे मोबाईल तपासले असता हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे वन खातेही चक्रावले असून सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

गव्याच्या दर्शनाने ‘या’ गावासह परिसरातील नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील जांभुळवाडी परिसरामध्ये दुपार पासून गवा रेडा फिरत आहे. त्यामुळे गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दुपार पासून गव्याला रेस्क्यू करण्यासाठी वनक्षेत्रपाल वनपाल वनरक्षक यांचा जांभुळवाडी उसाच्या फडाला घेराव घालून गव्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच जांभुळवाडी ढालगाव आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुचविण्यात आलेले आहे. भीउन जाऊ नका … Read more

किरपेत बिबट्याने पुन्हा पाडला शेळीचा फडशा, एकाचवेळी दोन बिबट्याचे दर्शन

Bibatya

कराड | कराड तालुक्यातील किरपे येथे गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात परिसरातील पाळीव कुत्रे तसेच शेळ्यावर मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तर शेतात जाणाऱ्या लोकांच्यात भीतीचे वातावरण वाढत चालले आहे. मंगळावारी दि. 25 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. किरपे येथे गेल्या … Read more

पुन्हा दर्शन : किरपेत ऊसात बिबट्या… बांधावर मजूर अन् वनविभाग झोपेत

कराड | कराड तालुक्यातील किरपे येथे दोन दिवसापूर्वी 5 वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला बिबट्याने केला होता. त्यानंतर या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. परिसरातील लोकांना व ऊसतोड मजूरांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. मात्र वनविभागाला बिबट्याचा मागमूस लागत नसल्याने मजूरांसह नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सुस्त वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कधी जागे होणार आणि बिबट्याचा … Read more

वनविभागाची कारवाई : मांडूळ जातीते साप विकणाऱ्या तिघांना अटक

खंडाळा | शिरवळ येथील शिरवळ – लोंणद रस्त्यावर असणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसरात जिवंत मांडूळ विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे. रवींद्र कंगाळे, अनिकेत यादव, संतोष काटे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, हा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार मांडूळ साप हा शेड्युल 4 मध्ये येत असून सातारा वनविभागाने ताब्यात घेतलेले … Read more

साताऱ्यात ट्रक, क्रेन जप्त : अवैध लाकूड वाहतूक प्रकरणी दोघांवर वनविभागाची कारवाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वनविभागाचे कर्मचारी रात्रगस्त घालत असताना मौजे गजवडी गावाच्या हद्दीत फणस, अकेशिया झाडांच्या लाकडांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रक व क्रेनवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली. वनविभागाने दिलेली माहिती अशी, सातारा वनविभाग अधिकारी व कर्मचारी रात्रगस्त घालत होते. यावेळी गजवडी गावच्या हद्दीत … Read more

सातारा तालुक्यात शिकारीसाठी लावलेल्या फास्यात अडकला “तरस”

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा तालुक्यातील मालगाव येथे वन्यप्राणी तरस शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फास्यामध्ये अडकला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरस प्राण्यास सोडवले. तसेच तरसास वन्यप्राणी अधिवासात सोडले आहे. मालगाव येथे काल सकाळी 11.30 वाजता वनविभागाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर वनरक्षक सातारा सुहास भोसले, डाॅ. चव्हाण यांच्यासह वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले. यावेळी … Read more

पाटणला वनविभागाचा छापा : सांबर शिकार प्रकरणी 5 जणांना अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर मधील नाव गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या प्राण्यांची शिकार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सांबराची शिकार केल्यानंतर त्याचे मांस शिजवत असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभाग हेळवाक यांना समजली. गोपनीय माहितीच्या आधारे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी छापा मारून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. वनविभागाकडून … Read more