साताऱ्यात सोने- चांदीचे दागिने पाॅलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा शहर पोलीस ठाणेचे हददीमधील कोडोली, विदयानगर याठिकाणी दोन अनोळखी इसमांनी घरामधील महिलेस सोने- चांदी दागिण्याची पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक केली. सदरील प्रकार काही वेळात महिलेच्या लक्षात आल्याने तिने पोलिस ठाणे गाठले. सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी तात्काळ दखल घेत एकास अटक केली आहे. सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात अशाप्रकारे … Read more

शहरातील 29 एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले 1 कोटी 17 लाख रुपये हडपले

औरंगाबाद – शहरातील राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांच्या 29 एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी आणलेले तब्बल 1 कोटी 16 लाख 80 हजार दोनशे रुपये एटीएम मध्ये न भरताच भरल्याचा बनाव केला. अधिकृतपणे पैसे भरल्याच्या नोंदीही केल्या. कंपनीने केलेल्या ऑडिटमध्ये पैशाचा अपहार झाल्याचे उघडकीस आल्यामुळे सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे आठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात … Read more

‘मोमोज’च्या फ्रॅंचाईजची आमिषाने भामट्यांचा व्यापाऱ्याला 12 लाखांचा चुना

औरंगाबाद – ‘वाव मोमोज’ची फ्रॅंचाईजी देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला तिघा भामट्यांनी तब्बल 11 लाख 96 हजार रुपयांना चुना लावला. हा प्रकार डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान घडला. याप्रकरणी तिघा भामट्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी औरंगाबादच्या सिंधी कॉलनीतील व्यापारी कैलास तलरेजा (वय 45) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे बीएचआर इंडियन … Read more

रंगाच्या व्यापाऱ्याला साडेबारा लाखांचा ‘चुना’

औरंगाबाद – शहरातील बीड रोडवरील निपाणी येथील पेंट्स कंपनीच्या गोदामातून फोनवर संपर्क झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवून 12 लाख 61 हजार 165 रुपये किमतीचे 1 हजार 724 कलरचे डब्बे आयशर गाडीत भरले. हे डबे शहरातील चेलीपुरा भागात देण्यास सांगितले. मात्र अनोळखी व्यक्तीने हमाल तेथे न उतरवता अकोला येथे घेऊन जात फसवणूक केली. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या … Read more

भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा; केंद्रीय जीएसटी विभागाची औरंगाबादेत धाड 

औरंगाबाद – प्रत्यक्षात भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता हजारपेक्षा अधिक बनावट बिले तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी)द्वारे सरकारला सुमारे 200 कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला केंद्रीय जीएसटी विभागाने अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्याला 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आता या घोटाळ्यात सहभागी झालेल्या वाळूज, हनुमाननगर येथील एका भंगार दुकानावर सायंकाळी धाड टाकण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील भंगार विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील समीर मलिक याने शहरात नारेगाव येथे सनसाईज इंटरप्राईजेस नावाने फर्म सुरु केली होती. त्यासाठी त्याने बोगस नोंदणी केली होती. त्याने 60 कोटींचे बोगस बिल फाडले होते. 10 कोटींची आयटीसी शहरातील 15 ते 16 भंगार विक्रेत्यांना फॉरवर्ड केली होती. या व्यवहाराचा संशय येथील केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना आल्यानंतर त्यांनी समीर मलिक याला औरंगाबादेत बोलावले व विमानतळावर शुक्रवारी 4 तार

Read more

दामदुप्पट पैसे देतो असे सांगून 15 लाखांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अल्पावधीत पैसे दुप्पट देतो असे सांगून 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पंढरपुरात समोर आलं आहे. या प्रकरणी पंढरपूर येथील संकल्प पतसंस्थेचे चेअरमन प्रथेमश सुरेश कट्टे यांच्यासह एकावर फसवणुकीचा‌ गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडालीय. याबाबत माहिती अशी की, सदर आरोपींशी ओळख असल्याने फिर्यादी सुरेश भिसे यांनी शेती खरेदी … Read more

फसवणूक : ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसवेकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Phaltan Police

फलटण | बनावट व खोटे संमतीपत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे, बरड तालुका फलटण गावच्या हद्दीतील दुकान गाळ्यांची बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी बरड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह एकूण 15 जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि 15 जानेवारी 2018 रोजी … Read more

क्रेडिट कार्डची वार्षिक शुल्क कमी करण्याचे अमिश दाखवत 2 लाखाला घातला गंडा

Credit Card

औरंगाबाद – क्रेडिट कार्डची वार्षिक फी कमी करून देण्याचे आमिष दाखवून परप्रांतीय भामट्याने कामगाराला ऑनलाईन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. 29 ते 31 मे 2021 दरम्यान तो घडला. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आठ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्तरंजन शिवाजीराव लोणीकर हे अदालत रोडवरील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांनी एसबीआय बँकेचे क्रेडिट … Read more

बहुचर्चित 30-30 घोटाळ्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद – मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या ‘तीस-तीस’ घोटाळ्यातून लोकांची फसवणूक करणाऱ्या संतोष उर्फ सचिन राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. तीस-तीस योजनेत लोकांकडून गुंतवणूक करुन साठेअठरा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप राठोडवर आहे. दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधी रुपयांत असण्याची शक्यता आहे. 30-30 योजनेत लोकांकडून गुंतवणूक केल्याची कबुली संतोष राठोडनं दिली होती. बिडकीन पोलिस ठाण्यास … Read more

फक्त 21 दिवसांत पैसे डबल करुन देतो; बार्शीत 200 कोटींच्या घोटाळ्याने खळबळ

vishal fate

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – बार्शीच्या स्कॅममुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. बार्शीतल्या प्रत्येक चौकात, चहाच्या टपऱ्यांवर, दुकांनामध्ये केवळ एकच विषय सुरु आहे कोणाचे किती बुडाले.आरोपी विशाल फटे हा गुंतवणुकदारांनी कोणत्याही मार्गाने पैसे दिले तरी स्विकारायचा. त्यामुळे ज्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी काळे धन जमा केले आहे. ते दुप्पट करण्याच्या आमिषाने विशालकडे दिले होते. आरोपी विशाल … Read more