IRCTC : सावधान !!! रिफंडच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून केली जात आहे फसवणूक

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच यासाठी फसवणूक करणाऱ्या लोकांकडून अनेक नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत. आता ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या लोकांकडून रेल्वे प्रवाशांना टार्गेट केले जात आहे. यावेळी तिकीट रिफंड करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. असेच एक प्रकरण … Read more

कराडच्या एकाची साडेनऊ लाखाची फसवणूक : ऊस टोळीच्या मुकादमावर गुन्हा

Karad Police City

कराड | ऊस तोडणीसाठी मजूर पुरवितो, असे सांगून मुकादमाने ट्रॅक्टर मालकाला साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातला. नुकताच हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक करणार्‍या मुकादमावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुभाष रामराव भोजने (रा. आंबेवडगाव, ता. धारुर, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमाचे नाव आहे. याबाबत केसे (ता. कराड) … Read more

सतेज पाटील यांचं नाव वापरून महिलेची फसवणूक; ‘एवढ्या’ लाखांचा घातला गंडा

Satej Patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सतेज पाटील यांचे नाव वापरून पुण्यातील एका महिलेला लाखों रुपयांचा गंडा (fraud) घालण्यात आला आहे. सुजाता राकेश चंद्र असे या महिलेचे नाव असून तिला विज्ञान विद्या लिमिटेड कंपनीच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी एका मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता होती. याकरता त्यांनी अनेक इन्वेस्टरकडून लोन (fraud) मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र एक वर्षापासून कोणीच … Read more

कोट्यावधीची फसवणूक : कालिकाई व अॅग्रो मल्टिस्टेटच्या तिघांना पोलिस कोठडी

Satara LCB

सातारा | ठाणे येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क अॅग्रो मल्टिस्टेट या कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याबाबत तक्रारी आल्यानंतर सातारा आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या संचालक मंडळातील पसार असलेल्या तिघांना मुंबई येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कमलाकर गंगाराम गोरिवले … Read more

‘दबंग लेडी PSI’ ने स्वतःच्या होणाऱ्या पतीला केली अटक, काय आहे नेमके प्रकरण ?

Junmoni Rabha

गुवाहाटी : वृत्तसंस्था – पोलीस अधिकारी असलेल्या एका तरुणीने आपल्याच होणाऱ्या नवऱ्याला अटक केली आहे. हे प्रकरण आसामच्या गुवाहाटीमधील आहे. जुनमोनी राभा (Junmoni Rabha) असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. तिचा होणारा पती राणा पोगाग याने ऑइल इंडिया लिमिटेडचा पीआर अधिकारी म्हणून आपली ओळख खोटी सांगत असे. जुनमोनी (Junmoni Rabha) यांनाही त्याने अशाच प्रकारे … Read more

Amazon ची फ्रेंचायसी घेऊन पैसा कमवा.. असं म्हणत लाखोंना लुबाडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अमेझॉन ई-स्टोअरची फ्रँचायसी देतो त्यातून वस्तूंची ऑफलाईन तसेच ऑनलाईन विक्री करून 18 टक्के, 12 टक्के कमिशन घेवू शकता असे आमिष दाखवून एकाला 4 लाख 97 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल रेहमान आणि आलोक अशी … Read more

सैन्यदलात नोकरीचे अमिष : सातारा जिल्ह्यातील तिघांची 15 लाख 60 हजार रूपयांची फसवणूक

सातारा | सातारा सैन्यदलात नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांची मिळून 15 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रवीण शिवाजी मरगजे (रा. कानवडी,ता. खंडाळा) या तोतया सैन्य अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा व लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने अटक केली आहे. त्याच्यावर दहिवडी व वडूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दहिवडी पोलिसांनी संशयितास न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस … Read more

दोन महिलांना पोलिस कोठडी : कमी व्याजदराने कर्ज देण्याचे अमिष दाखवून फसवणूक

सातारा | कमी व्याज दराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून सुमारे पाच जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिलांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. संशयित महिलांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. कोमल सनी भिसे (वय- 26, रा. गणेश प्लाझा, देगाव रोड), अनिता पाटील उर्फ राणी किशोर गालफाडे (वय- 42, रा. क्षितिजा अपार्टमेंट, शाहपुरी) अशी संशयित महिलांची नावे आहेत. याप्रकरणी … Read more

बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या लॉकर मध्ये कोट्यावधींचे घबाड 

  औरंगाबाद – औरंगाबादमधील बांधकाम विभागातील एका शाखा अभियंत्याकडे लाखोंच रुपयांचं घबाड सापडलंय. बँकेतल्या एकाच लॉकरमध्ये इतकं मोठं घबाड सापडल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकलेत. बांधकाम विभागातील लाचखोर अभियंत्याचं नाव संजय राजाराम पाटील आहे. औरंगाबाद शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी संजय पाटीलने सव्वा लाखाची लाच मागितली होती. त्यात तडजोड होऊन चाळीस हजाराचा पहिला … Read more

LIC ची ‘ही’ पॉलिसी घेण्यापूर्वी त्याबाबतची वास्तविकता जाणून घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान

LIC

नवी दिल्ली I देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी LIC ने ग्राहकांना आपल्या नावाने विकल्या जाणाऱ्या ‘कन्यादान’ पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू नयेत असा इशारा दिला आहे. मुलीच्या लग्नासाठी फंड उभारण्याचा दावा करणारी ही पॉलिसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. LIC ने नुकतेच ट्विट केले की, कंपनीकडून अशी कोणतीही पॉलिसी विकली जात नाही. LIC ने … Read more