रमेशकुमार..! कधी काळचा खुंखार नक्षलवादी

व्यक्तिवेध | दत्ता कानवटे रमेशकुमार..! कधिकाळाचा खुंखार नक्षलवादी… पण हल्ली शेती करतोय… नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील उमरी बाजार गावाच्या डोंगरात असलेल्या निबिड जमिनीवर याने शेती उकरली आणि आता त्यावरच गुजराण करतोय, मी त्याच्याकडे गेलो ते भर हिवाळ्यात थंडी अंगाची हाडं कडकडून सोडत होती त्यावेळी..! उन्हे आणखी निटसी उतरली नव्हती अगदी इतक्या भल्या सकाळी मी त्याच्या … Read more

भामरागडमधील ग्रामसभा करणार मोहाच्या फुलांची थेट विक्री

गडचिरोली प्रतिनिधी | भामरागड तालुक्यातील काही ग्रामसभा पहिल्यांदाच मोहा फुलांची विक्री ठोक व थेट चांगल्या भावात करणार आहेत. या पूर्वी लोक येथील मोहाची फुले फार कमी किमतीत व मीठ, तेल, मासे, इत्यादी वस्तुच्या बदल्यात विकत होते. यात या क्षेत्रातील आदिवासी व इतर समुदायाच्या लोकांची आर्थिक पिळवणूक होत होती. परिणामी आदिवासी व अन्य परंपरागत वन निवासीवरील … Read more

शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात दोन भावांचा बुडून मृत्यू

गडचिरोली प्रतिनिधी | विटभट्टीवरील राख आणण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा शेततलावासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज १८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील बोदली शेतशिवारात घडली. मुन्ना मनोहर मेश्राम (१३) व किसन जगदिश मेश्राम (१३) दोन्ही रा. बोदली अशी मृतक भावांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मुन्ना व किसन हे चुलत भाऊ … Read more

सरकारी इमारतींसमोर बॅनर लावून नक्षल्यांचे जिल्हा बंदचे आवाहन

Untitled design

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक नक्षल्यांनी एटापल्ली, गट्टा, जांभिया व अन्य ठिकाणी बॅनर लावल्याचे आढळले असून, जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा यांची हत्या पोलिसांनी खोट्या चकमकीत केल्याचा आरोप करुन १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. एटापल्ली येथील वनविभागाच्या नाक्याजवळ, तसेच जांभिया येथील शासकीय आश्रमशाळा, समाजमंदिर व अन्य ठिकाणी नक्षल्यांनी बॅनर … Read more

विदेशात जाऊन ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ करणारी पहिली आदीवासी मुलगी

गडचिरोली प्रतिनिधी | अलिकडे आदिवासी मुला-मुलींमध्येही शिक्षणविषयक जागृती निर्माण होत असून, शिक्षणाचं प्रमाणही वाढत आहे. आदिवासी विद्यार्थी आता विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ लागले आहेत. मात्र, नियती प्रभूराजगडकर या विद्यार्थिनीची ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ या अभ्यासक्रमासाठी आस्ट्रेलियाच्या विद्यापीठात निवड झाली आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी विदेशात निवड झालेली नियती राजगडकर ही बहुदा पहिलीच आदिवासी विद्यार्थिनी असावी, असा अंदाज … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जागेचा निकाल लागणार सर्वात आधी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून येत्या २३ तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत सर्वात वेगवान निकाल हा गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचा लागण्याची शक्यता आहे. कारण या मतदार संघात भाजप आणि काँग्रेस यांच्या सह अवघे पाच उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा ‘पर्दाफाश’ जेवढे कमी उमेदवार तेवढा निकाल वेगवान असे सूत्र … Read more

पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच रचला नक्षली भास्कर ने स्फोटाचा कट ?

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक १ मे रोजी झालेल्या जांभूळखेडा येथील भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाल्याप्रकरणी आणि दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ या दोन्ही घटनांप्रकरणी जहाल नक्षलवादी कमांडर तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर व त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात देशद्रोह आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ एप्रिलच्या … Read more

नक्षली हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे : रामदास आठवले

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |नक्षलवादी हल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणे चुकीचे आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत विरोधांनी राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले . त्यांच प्रमाणे या हल्ल्याचे राजकारण नाही केले पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. नक्षलवादी हल्ले कोणतेही सरकार असले तरी होतच असतात त्यामुळे आपण अशावेळी सरकारवर टीका नकरता सरकारच्या पाठीशी उभा राहिले … Read more

दारूविक्रेत्या महिलेला मुक्तिपथने सिनेस्टाइल पकडले, वाचा नक्की काय आहे प्रकरण

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक अनेक वर्षांपासून निडरपणे दारूविक्री करणाऱ्या वासाडा येथील महिलेला देशी दारूच्या मुद्देमालासह मुक्तिपथ गाव संघटनेच्या सदस्यांनी रंगेहात पकडले. निशा मेश्राम असे दारूविक्रेत्या महिलेचे नाव आहे. खासगी वाहनातून ही महिला दारूची वाहतूक करीत होती. आरमोरी पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. वासाडा येथील निशा मेश्राम ही अनेक वर्षांपासून दारूविक्रीचा व्यवसाय करीत … Read more

Breaking News | नक्षलवाद्यांच्या भूसुरुंग स्फोटात १५ जवानांचा मृत्यू ; दिवस दिवसभरातील दुसरी घटना

cfa f c bcf

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक आज मध्यरात्री दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षल्यांनी आज पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडविल्याने १५ जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील पोलिसांचा गौरव होत असताना आज १५ जवानांना शहीद व्हावे लागल्याने पोलिस विभागावर शोककळा पसरली आहे. … Read more