कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणाचे 6 दरवाजे उघडले

सातारा । कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणाचे 6 वक्री दरवाजे 1 फुट 9 इंचांने उघडल्याने 9200 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु झाला आहे. याशिवाय पायथा वीज गृहातून 1050 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून एकुण 10350 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. … Read more

मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका; दरड कोसळल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प!

मुंबई । मुंबई आणि कोकणात अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे. मुसळधार पाऊस आणि कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गोवा येथील पेडणे बोगद्यात दरड कोसळली असून काही एक्स्प्रेस गाड्या मडगाव-लोंडा-मिरज-पुणे- पनवेल- कल्याण मार्गे पुढे काढण्यात आला आहेत. तर काही पनवेल-पुणे-लोंडा-मडगाव मार्गे अशी वळविण्यात … Read more

२६४ कोटी खर्च करून बांधलेला पूल जेव्हा २९ दिवसांत वाहून जातो; पहा व्हिडिओ

पाटणा । बिहार राज्य सध्या दुहेरी संकटामध्ये सापडलं आहे. एकीकडे करोनाचा कहर तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरजन्य परिस्थिती. अशातच २९ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्घाटन केलेल्या पूलाचा एक भागच पाण्यात वाहून गेला. महत्वाची बाब म्हणजे हा पूल बांधण्यासाठी तब्बल २६४ कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. दरम्यान, इतके पैसे खर्च करून बांधलेला पूल … Read more

पुराच्या पाण्यातून गुरे वाहून जातानाचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरु असून अनेक गावांमध्ये पूर आला आहे. येथील जनजीवन संपूर्णतः विस्कळीत झाले असून सध्या पूरस्थिती गंभीर झाली आहे. गुजरातच्या खिजडीया मोटा या गावात पुराच्या पाण्यामध्ये जनावरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. पडधरी, राजकोट या परिसरात होणाऱ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमध्ये संततधार सुरु असल्याने गावांनी … Read more

राज्याच्या ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुणे । भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट भागामध्ये अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे १ जूनलाही काही भागात … Read more

केरळमध्ये मान्सून यायला ४ दिवस उशीर; ‘या’ कारणामुळे यंदा पाऊस होणार लेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैऋत्य मान्सूनची प्रतीक्षा आता सुरू झाली आहे. दरम्यान, यावर्षी मान्सूनला केरळमध्ये यायला चार दिवस उशीर होऊ शकेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. याबाबत माहिती देताना हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, केरळमध्ये नैऋत्य मान्सूनची सुरूवात यंदाच्या १ जूनच्या तारखेपासून थोड्या वेळानंतर होण्याची शक्यता आहे. यावर्षी ५ जूनपासून केरळमध्ये मान्सूनला … Read more

भारतात १६ मे रोजी येणार चक्रीवादळ; हवामान खात्याने दिली चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटावेळी भारतासमोर आता आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. भारतीय हवामान खात्याने बुधवारी सांगितले की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळे १६ मे रोजी चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणपूर्व भागावर हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या … Read more

देशात या राज्यांत पुढच्या २४ तासांत येणार वादळ; हवामान खात्याचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांत अवकाळी पाऊस आणि धूळीचे वादळही सुरु आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, येत्या २४ तासांत जयपूर, दौसा, नागौर, अजमेर, श्रीमाधोपूर, अलवर, भरतपूर, करौली आणि धौलपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ३५ किमी / तास वेगाने या वादळाचा अंदाज … Read more

अतिवृष्टीने शेतकरी देशोधडीला, उभ्या सोयाबीन पिकावर फिरविला ट्रॅक्टर

अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. कर्जबाजारी होत, बैलजोडी विकून शेतकऱ्यांनी शेती केली. मात्र पावसामुळे पीक मातीमोल झाले. त्यामुळे अतिवृष्टीने ओढवलेल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने काळजावर दगड ठेवत खराब झालेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

राज्यात पुढील ४८ तासांत ‘मुसळधार पाऊस’; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात २७ ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.