सावधान ! औरंगाबादेत पुढील चार दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Aurangabad Rain

औरंगाबाद – परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला मुसळधार पावसाला अजूनही सामोरे जावे लागत आहे . मराठवाड्यातील विविध भागात सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो. काही काळ ऊन राहते. पण दुपारनंतर ऊन-पावसाचा खेळ सुरु होतोय. वातावरण पूर्णपणे स्वच्छ असतानाच अचानक झाकोळून येतं आणि ढगांचा प्रचंड गडगडाट ऐकू येतो. क्षणात पावसाला सुरुवात होते. त्या पाठोपाठ वीजांचा कडकडाट सुरु होतो. … Read more

औरंगाबाद- जळगावचा संपर्क तुटला; तिडका नदीला पूर

औरंगाबाद – शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यात चांगलेच थैमान घातले आहे. जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील तिडका नदीला तुफान पूर आला आहे. मध्यरात्रीतून पावसाचे चांगलाच जोर पकडल्यामुळे सोयगावात अनेक ठिकाणी पूराचे पाणी शिरले आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने सोयगावात पूर आला आहे. या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यमार्ग बंद … Read more

औरंगाबादकरांची झोपमोड ! सकाळीच विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस

औरंगाबाद – गेल्या सोमवारपासून देशात राजस्थानमधुन परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळाने 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना झोडपून काढले. या चक्रिवादळाचा प्रवास नंतर उत्तर महाराष्ट्रात व गुजरात मार्गे अरबी समुद्रात गेल्याने या गुलाब चक्रिवादळाचे नामकरण शाहीन करण्यात आले. शाहीन चक्रिवादळ सध्या सक्रिय असुन ओमान च्या … Read more

जिल्ह्याला ‘गुलाबाचा’ तडाखा ! दोनच दिवसात तब्बल १४१ कोटीचे नुकसान

Heavy Rain

औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्याला चांगलाच तडाखा बसला आहे. जिल्ह्यात तब्बल 141 कोटी 46 लाख 48 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरात अडकलेल्या साडेपाचशेहून अधिक लोकांची मदत करून सुटका करण्यात आलेली आहे तर 260 लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे पावसाने मोठ्या प्रमाणावर … Read more

महापालिकेला पुर नियंत्रणासाठी मिळणार 14 कोटी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात मागील महिनाभरात दोन वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहराच्या अनेक भागात नागरिकांच्या घरात तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याअनुषंगाने विविध कामे करण्यासाठी महापालिकेला 14 कोटी 85 लाख 3 हजार 804 रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी … Read more

नुकसानीचे पंचनामे बांधावर जाऊन व्हावे; आमदार दानवेंची मुख्यमंत्रांकडे मागणी

Ambadas danave

औरंगाबाद – जिल्ह्यासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. अशातच अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहिती स्थानिक पातळीवर कार्यरत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जावेत, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी … Read more

शहर आणि परिसरात पुन्हा एकदा वीजांच्या कडकडाटासह बरसल्या सरी

Heavy Rain

औरंगाबाद – दोन दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि परिसरात पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. मात्र आज 01 ऑक्टोबर रोजी दुपारपासून पुन्हा एकदा चार वाजता वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. औरंगाबद शहरासह दौलताबाद, खुलताबाद, पैठण, कन्नड भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले होते. दरम्यान पुढील तीन दिवस म्हणजे 04 … Read more

नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांचे शेतातल्या पाण्यात लोटांगण आंदोलन

andolan

औरंगाबाद – जिल्ह्यातील शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हेक्‍टरी दोन लाख रुपये तात्काळ मदत मिळावी म्हणून झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी खराब झालेल्या पिकांमध्ये अर्धनग्न लोटांगण आंदोलन केले. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचेही अतिवृष्टीतील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नुकसान भरपाई होण्यासाठी … Read more

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 845 कोटींचे नुकसान

Heavy Rain

औरंगाबाद – मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या तुफानी पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. यापावसामुळ सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने दहा लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पीकांचे नुकसान केले आहे याशिवाय जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या नुकसानीतुन मराठवाड्याला सावरण्यासाठी सुमारे 845 कोटी 79 लाख रूपयांच्या मदतीची गरज असल्याचा प्राथमिक अहवाल तयार … Read more

मराठवाड्यातील आठ धरणे शंभर टक्के भरली

Koyna Dam

औरंगाबाद – मराठवाड्यातील सिद्धेश्‍वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि मानार ही मोठी धरणे शंभर टक्के भरली असून जायकवाडी धरणाचीही शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. निम्न दुधना वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ‘दलघमी’ मध्ये अशी येलदरी 791.99, सिद्धेश्‍वर 80.96, मानार 138.21, विष्णुपुरी 80.79, निम्न दुधना 242.20, … Read more